Kalyan News : गीतेत सांगितल्या प्रमाणे युद्धात समोरचा शत्रू भाऊ असला तरी त्याला मारल्या शिवाय विजय भेटू शकत नाही, तसेच युतीचा उमेदवार का ना असो, आमच्या समोर युतीच्या उमेदवाराला गारद करुन शिवसेनेचे पॅनल निवडून येईल, असे विधान कल्याणमधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केल्यावर भाजप देखील आक्रमक झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील महायुतीत विष पेरण्याचे काम अरविंद मोरे यांनीच केले आहे. राज्य मिळविण्याकरीता भावाने भावाला मारले पाहिजे, ही विचारधारा त्यांची आहे. आमचा पक्ष श्रीरामाला मानणारा आहे. भरतला राज्य मिळावे यासाठी श्रीरामाने वनवास सोसला. परंतू त्यांची विचारधारा ही औरंजेबाची आहे, असा पलटवार भाजपचे नेते दया गायकवाड यांनी केला आहे.
Arvind More : पॅनल क्रमांक 2 हा शिवसेनेचा बालेकिल्ला, भाजपला एकही जागा सोडणार नाही
कल्याण डोंबिवलीवलीत शिवसेना भाजपमध्ये पक्ष प्रवेशावरुन चांगलाच वादंग झालाय. डोंबिवलीतील आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण एकत्रित्रत आल्यावर महायुतीमधील वाद मिटला असल्याचा संकेत दिला. असे दाखविण्याचा प्रयत्न झाला की सगळे काही आलबेल आहे. मात्र पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाची ठिणगी पडली आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर 2014 सालची निवडणूक लढविली. नंतर मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणीस झाले. पॅनल क्रमांक 2 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भाजपला एकही जागा सोडणार नाही. राज्य मिळविण्यासाठी समोरचा शत्रू भाऊ आसला तरी त्याला मारल्या शिवाय विजय भेटत नाही. युतीतील उमेदवाराला गारद करुन शिवसेनेचे पॅनल निवडून आणणार असे विधान केले. मोरे यांच्या या विधानानंतर भाजपने पलटवार केला आहे. या बाबत भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांना त्याच भाषेत उत्तर दिले आहे.
Daya Gaikwad in Kalyan : भावाला मारुन राज्य मिळविणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे
अरविंद मोरे हेच महायुतीत विष पेरणारे आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीत जे काही मतभेद झाले त्याला खरे तर मोरेच जबाबदार आहे. महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ नेते घेतात. अरविंद मोरे आणि आमच्या सारखा कार्यकर्ता महायुतीचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी राज्य जिंकण्यासाठी समोरचा शत्रू हा भाऊ असला तरी त्याला मारल्याशिवाय विजय भेटू शकत नाही. ही भाषा आमची नाही. ही विचारधारा आमची नाही. आमची विचारधारा श्रीरामाला मानणारी आहे. श्रीरामांनी भरत यांना राज्य मिळावे त्यासाठी श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास सोडला. भावाला मारुन राज्य मिळविणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे आहे. अशी प्रतिक्रिया दया गायकवाड यांनी दिलीय.
ही बातमी वाचा :