एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Manoj Jarange: मनोज जरांगेंचं उपोषण 90 दिवसांसाठी स्थगित; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis On Manoj Jarange: मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 

Devendra Fadnavis On Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज (17 सप्टेंबर) उपोषण स्थगित (Manoj Jarange Patil Protest) करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी 90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच उपोषण स्थगित केलंय, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे. जीआर काढून गॅझेटियरची अंमलबजावणी करावी. 58 लाख नोंदींमधील एकही नोंद कमी व्हायला नको...नोंदी कमी करणार नाही, याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. तसंच मुंबईत गेलेल्या 1 लाख 07 हजार समर्थकांनी माघारी यावं असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी केलं आहे.

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Manoj Jarange)

मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याचा मला आनंद आहे. मनोज जरांगेंच्या 13 मागण्यांपैकी 12 मागण्या आम्ही मान्य केल्या होत्या. एका मागणीबाबत आम्ही त्यांना कायदेशीर अडचणी सांगितल्या होत्या. त्यामुळे आम्ही ज्या मागण्या मान्य केल्या आहेत, समितीने जे काही आश्वसनं दिली आहेत, ते सर्व आम्ही पूर्ण करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आमचे निर्णय आधीच झाले आहेत, काही प्रशासकीय अडचणी आहेत, त्या दूर करायच्या आहे, तेही आम्ही करु...सरकार नेहमीच सकारात्मक राहिलंय. आमचे दरवाजे नेहमी उघडे आहेत. मराठा समाजासाठी मी आणि एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले, तेवढे निर्णय कधीच कोणी घेतले नाही. मराठा समाजाला जे काही मिळालं, ते आमच्या काळात मिळालेलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता कुठल्याही सणामध्ये विघ्न न येता, आज हे उपोषण स्थगित झालंय, याचा मला आनंद आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.  

मनोज जरांगेंना सरकारने कोणती हमी दिली? (What assurance did the government give to Manoj Jarange?)

  • सातारा, कोल्हापूर, पुणे, औंधचं गॅझेट तीन महिन्यांत जीआर काढून लागू करु
  • हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी सुधारीत जीआर काढू
  • हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांना वैधता देणं चालूच राहील
  • शिंदे समितीस मिळालेल्या 58 लाख नोंदी घटवणार नाही 
  • मराठवाडयातील 4 लोकप्रतिनिधींची रद्द केलेली कुणबी प्रमाणपत्रे वैध करु

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे माझे वैरी नाहीत- मनोज जरांगे (Manoj Jarange On Devendra Fadnavis And Eknath Shinde)

आज सकाळी 5 वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीसाठी बीडमधील पाटोदा येथे दाखल झालं होतं. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस यांचा समावेश होता. जवळपास 1.30 तास मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळ यांच्यात चर्चा झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा समाजाला खुन्नस देणं चांगलं नाही. चर्चा न करणारे आज चर्चेसाठी आले की नाही?, आरक्षणापेक्षा समाजाची इज्जत महत्वाची आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माझे वैरी नाहीत. पण समोरुन वार आलं, तर काय करणार?, असा सवालही मनोज जरांगेंनी उपस्थित केला. तसेच राधाकृष्ण विखे चुकत असले तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेंवरही प्रेम करु पण आता नाही. मंत्र्यांनी टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही, असंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. 

मनोज जरांगे-पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:

संबंधित बातम्या:

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, आंदोलन सुरुच राहणार; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर सकाळी 6 वाजता बीडमध्ये काय घडलं?

Manoj Jarange Patil Protest News: मुंबईच्या दिशेने दोन दिवसांआधी निघाले, आज मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारकडून कोणत्या हमी?, A टू Z माहिती

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
Raj Thackeray : 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं... राज ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आशिष शेलार यांना मिश्किल टोला
2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं... राज ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आशिष शेलार यांना मिश्किल टोला
Maharashtra Politics : मोठी बातमी! आधी बंद दाराआड गुप्त चर्चा, अन् नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर
मोठी बातमी! आधी बंद दाराआड गुप्त चर्चा, अन् नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget