Devendra Fadnavis on Uttam Jankar, Akluj : "काही पोपटही बोलायला लागले आहेत. तुम्हीच दादा पोपटांना मोठं केलं. माझ्याकडे विमानात घेऊन आलात. ते आता अजितदादांवर बोलतात आणि कोणावर बोलतात. रातोरात त्यांना वाटू लागलं की ते राष्ट्रीय नेते झाले. राष्ट्रीय नेत्यांसारखे बोलू लागले. त्यांना हे माहिती नाही की, हिच ती जनता आहे. ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं. कारण ते संघर्ष करतील, असं वाटलं होतं. पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला. जनता त्यांच्या पाठिशी उभी राहणार नाही. माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अकलूज येथे महायुतीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्यावर चौफेर टीका केली.  


देवेंद्र फडणवीस म्हणाले, माळशीरसने निर्णय घेतला आहे. चिंता करण्याचे कारण नाही. एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगितली पाहिजे. पवार साहेबांनी यांची दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या. कारखाने बंद पडले होते. त्यावेळी आमच्याकडे ही मंडळी आली. आम्ही विचार केला, जुनीजानती मंडळी आहे. यांना जवळ केलं पाहिजे. यांना जवळ केलं. फक्त जवळ केलं नाही. राजकारणातही पुनर्वसन केलं, कारखान्यातही पुनर्वसन केलं. 


पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीजींनी एनसीडीची योजना सुरु केली. तेव्हा यांना सगळं मिळालं. यांना परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा यांनी पवार साहेबांचा हात धरला. पण हे लक्षात ठेवा, जनतेच्या मनात मोदीजी आहे. वर्षानुवर्षे जी काम होत नव्हती, स्वप्न दाखवले जायचे. ते तुम्ही करुन दाखवलं, म्हणून पवार साहेबांचा तुमचा राग आहे. ते म्हणतात 5 वर्ष निवडून आलाय. 


मोदीजी पंतप्रधान झाले नाहीत तर देशाचे नुकसान होणार नाही


निंबाळकर वि. मोहिते अशी निवडणूक नाही. मोदीजी पंतप्रधान झाले नाहीत तर देशाचे नुकसान होणार नाही. रणजितदादांना मतदान केलं तर मोदींना मिळत. अन्य लोकांना केलं तर राहुल गांधींना जात. शरद पवारांचे तर अस्तित्वच नाहीये. त्यांचा येणार कोणी नाही. मात्र, 10 आले तर काय होणार नाही. या निवडणुकीत दोनच गट आहेत. एका बाजूला विश्वगुरू मोदीजी आहेत.  तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ranjit Nimbalkar on Ranjitsinh Mohite Patil : अकलूज चौकात रणजितसिंह मोहितेंचा फुलांचा गुच्छ फडणवीस यांनी स्वीकारला नाही, गद्दारांना माफी नाही, रणजित निंबाळकरांचा हल्लाबोल