Ranjit Nimbalkar on Ranjitsinh Mohite Patil : "एवढी मदत करुनही गद्दारी केली. अकलूज चौकात फुलांचा गुच्छ घेवून रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil ) स्वागतासाठी उभे होते, पण फडणवीस यांनी तो स्वीकारला नाही. ते थेट सभेकडे आले. गद्दारांना माफी नाही आता त्याची दखल पक्ष घेणार नाही", असे माढाचे महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) म्हणाले. अकलूज येथे महायुतीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर चौफेर टीका केली. 


लवकरच धवलदादा आपल्यासोबत येणार आहेत


रणजित निंबाळकर म्हणाले, एक एक रुपयाचा हिशोब घेणार आहे. मी कोणाच्या बापाला भित नाही. त्यांच्या बापाला बारामतीकरांना भित नाही. काय ताकद लावायची ती लावा तुम्हाला पाडणार  आहे. चार तारखेला रिझल्ट काय होईल ते कळेल, असंही रणजित निंबाळकर यांनी म्हटलं. माळशीरस तालुक्याचे पालकत्व आम्ही घेतलं आहे. धवलदादांच्या घोषणा देणाऱ्यांना सांगायचे आहे की, लवकरच धवलदादा आपल्यासोबत येणार आहेत, असंही निंबाळकर यांनी स्पष्ट केलं. मोदी 30 तारखेला आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत.


धनगर समाजाला पेटवण्याचे काम शरद पवारांनी केलं


मोदी सरकारच्या योजनाचा लाभ न मिळालेला माणूस मला आणून दाखवा. शरद पवारांनी जातीभेद निर्माण केला. धनगर समाजाला पेटवण्याचे काम शरद पवारांनी केलं. आण्णासाहेब पाटील शरद पवारांकडे गेले होते. म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, तर मी आत्महत्या करेन. त्यांनी आत्महत्या केली, पण आरक्षण मिळालं नाही. शरद पवार गद्दार आहेत. उद्धव ठाकरेही तसेच आहेत. पाणी बारामतीला घेऊन गेले. माझ्यासमोरचा उमेदवार गद्दार आहे. शरद पवार गद्दार आहेत. उद्धव ठाकरे गद्दार आहेत, अशी टीकाही रणजित निंबाळकर यांनी केली आहे. 


पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, भविष्यात या भागात लक्ष्मी नांदणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे कल्याण करण्याची शक्ती मोदीजी आणि आमच्यामध्ये आहे. छोटे मोठे रस्ते तयार झाले आहेत. भविष्यात आम्ही सर्व मंडळी पाण्यासाठी एकत्र आलो आहोत. पाणी हेच आमचं जीवन आहे. एक माणूस मिळणार नाही की, त्याला मोदीजींच्या कामाचा लाभ जाणार नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray on Narendra Modi : काँग्रेसला 60 वर्षात कमावता आले नाही ते मोदींनी निवडणूक रोख्यातून 10 हजार कोटी लुबाडले; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल