Devendra Fadnavis on Mohite Patil : " चर्चा नेहमीच उलटसुलट केली जाते, पण पहिल्या दोन्ही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला विजय मिळवून देणारे आहे. विरोधकांना त्यांचे मतदार आणि केडर यांच्यात उत्साह दिसत नाही. तो उत्साह आणण्यासाठी विरोधकांना विजय आमचाच असे सांगावे लागते",असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. शिवाय आम्ही टीकेला कृतीतून उत्तर देतो, असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला मविआचे उमेदवार धैर्यशील मोहितेंना दिला आहे. सांगोल्यात रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले,  आपण जिंकतो अशा अफवा सोडल्या तर कार्यकर्ते काम करतील, असं मविआच्या नेत्यांना वाटतं. दोन टप्प्यात महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड मतदान मिळाल्याने मतदान झालेल्या जागा मोठ्या मताधिक्य घेवून जिंकणार आहोत. भुजबळ यांचे संपूर्ण वक्तव्य तुम्ही ऐकले नाही. त्यातील एखादे वाक्य काढायचे आणि दिवसभर चालवायचे काम मीडिया करत असल्याचे सांगितले. आम्हाला राजकारण येतं नाही, आम्ही राजकारणात तरबेज नाही. आम्हाला जनतेने त्यांचे दुःख कमी करण्यासाठी त्यांच्या आशा आकांशा पूर्ण करण्यासाठी निवडून दिले. त्यामुळे पन्नास वर्ष जे काम आश्वासन देऊन करू शकले नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवले. आम्ही विरोधी उमेदवाराला विचारतो तुम्ही काय केलं हे एक तरी काम सांगा, मतांचा केवळ वापर केला. 


जो निर्णय झाला हा त्यांच्या घरातही सगळ्यांना पटलेला नाही


पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, जशी माढा , सांगोला सभा घेतोय तशीच अकलूज सभा आहे. आज धवल सिंह मोहिते किंवा अभिजित पाटील यांच्यासह कोणाचेही प्रवेश होणार नाहीत. ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांना अडचणीत आणून त्यांचे राजकारण जवळ जवळ संपवले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. जो निर्णय झाला हा त्यांच्या घरातही सगळ्यांना पटलेला नाही. मी यावर अधिक बोलणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. जोपर्यंत योजना पूर्ण होतं नाहीत तोपर्यंत निधीचा ओघ कमी होणार नाही.  मी देखील समजायचो की या भागतील दुष्काळला उपाय नाही, हा निसर्गाचा कोप आहे. पण मुख्यमंत्री झाल्यावर अभ्यास केला आणि लक्षात आलं की, काही मोठ्या नेत्यांनी पाणी अडवून ठेवलंय. मोठे नेते अशा नेत्यांना आणायचे की सर्व होऊ दे फक्त पाण्याचा प्रश्न नाही सुटला पाहिजे, असेही फडणवीस यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या