Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : गेल्या आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीतून त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. "उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर त्यांच्या मदतीला पहिल्यांदा धावून जाईन. "अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांना मदत करणारा मी पहिला असेन", असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, पीएम मोदींनी प्रेमाचा वर्षाव केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये घेतलेल्या सभेतून उत्तर दिले होते. दरम्यान, पीएम मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केल्यानंतर राजकारणात पुढे काय घडणार? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे.


पीएम मोदींनी प्रेम व्यक्त केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिले होते. "मोदींना तुमचं प्रेम आलाय, मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. पुरावा कोण कोणाला देणार, पण मोदीजी काही खरं असेल तर तुमच्या खाल्याच्या माणसांना माहिती नव्हतं काय? हा उद्धव ठाकरेही तुमच्यावर काही संकट आलं तर पहिल्यांदा मदतीला धावून जाईल", असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. 


दरम्यान, पीएम मोदी आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी 'दिव्य मराठी' वृत्तसंस्थेला मुलाखत दिली यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं. फडणवीस म्हणाले," उद्धव ठाकरेंवर रुग्णालयात उपचार सुरु होते, तेव्हा आमचा शिवसेनेशी टोकाच संघर्ष सुरु होता. कारण त्यांनी आमचा विश्वासघात केला होता. 


आम्ही केवळ वैचारिक विरोधक आहोत


पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, तरिही मोदीजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना फोन करुन विचारपूस करायचे. ही माणूसकी आहे. आम्ही काही शत्रू नाहीत. आम्ही केवळ वैचारिक विरोधक आहोत. त्यामुळेच मोदीजींनी उद्या जर उद्धव ठाकरेंना वैयक्तिकदृष्ट्या मदत लागल्या करेन, पण राजकीयदृष्ट्या मदत करणार नाही, असे स्पष्ट सांगितले. कारण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केला आहे. 


उद्धव ठाकरेंसोबत जाणार का?


उद्धव ठाकरेंसोबत पुढे जवळीक निर्माण होणार का? याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जवळीक निर्माण होण्याची मला तरी शक्यता दिसत नाही, असे देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


शिंदे गटाचा शिर्डीचा उमेदवार म्हणजे सूर्याजी पिसाळाची अवलाद, अंबादास दानवेंची सदाशिव लोखंडेंवर जहरी टीका