एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!

Devendra Fadnavis On Raj Thackeray Uddhav Thackeray SIR Demand: महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द करावा. तसेच यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.

Devendra Fadnavis On Raj Thackeray Uddhav Thackeray SIR Demand: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (ECI Gyanesh Kumar) यांच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत गर्जना मोर्चा काढला. यावेळी महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द करावा. तसेच यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, अशी मागणी राज ठाकरेंनी (Raj Thackeray On SIR) केली. ठाकरे बंधूंसह विरोधी पक्षांनी देखील एसआयआरविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक्सवर पोस्ट करत एसआयआरवर प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On SIR)

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादीतील नोंदी अचूक व विश्वासार्ह राहाव्यात, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील SIR 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर SIR 2026 मधील महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसेच अचूक आणि अद्ययावत मतदार यादी, विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा आधार, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र SIR 2026 आकडेवारी- (Devendra Fadnavis On Raj Thackeray Uddhav Thackeray SIR Demand)

  1. SIRपूर्वी महाराष्ट्रातील 9.78 कोटींहून अधिक मतदार प्रारूप मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी आधारभूत यादीत होते.
  2. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7.71 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
  3. जुन्या मतदार यादीतील ज्या मतदारांची संबंधित गणना प्रपत्रे प्राप्त झालेली नाहीत, त्यांची नावे गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंद झालेली (दुबार नोंदणी) किंवा इतर कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
  4. अशा मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. EPIC क्रमांकाच्या आधारे नागरिकांना आपले नाव तपासता येणार असून मतदान केंद्रनिहाय ASDD यादी डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
  5. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना प्रपत्र-6 आणि घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे. 
  6. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही प्रपत्र-6 द्वारे अर्ज करता येणार आहे.
  7. ऑनलाइन अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal वर करता येतो. संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे.
  8. प्रारूप मतदार यादी आणि SIR अंतर्गत ASDD यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांना EPIC क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे आपले नाव तपासता येणार आहे.
  9. योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित प्रक्रियेद्वारे अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते? (Raj Thackeray On ECI SIR)

2024 च्या निवडणुकीत महायुतीला संपूर्ण बहुमत मिळालं, पण महाराष्ट्रात जल्लोष नाही. लोकांमध्ये उत्साह नाही. संपूर्ण सन्नाटा होता, मग हा कोणता विजय? 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले. लोकसभा आणि विधानसभेत 1 कोटी मत वाढली. तुमची इतकी मत वाढली आता सगळ्या गोष्टी उघड झाल्या, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच देशभरात मतचोरीमुळे वातावरण तापलंय. मी 2017 पासून सांगतोय, की मतचोरी सुरु आहे. त्यादरम्यान, मी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, तृणमृल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. मी सतत सांगत होतो. मतांमध्ये चोरी होत आहे. त्यावेळी मी निवडणुकांवर बहिष्कार टाका, असं म्हणत होतो, असंही राज ठाकरे गर्जना मोर्चात म्हणाले. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: SIR बेकायदेशीर, माझ्या फक्त 2 मागण्या, दिल्लीतही जाऊन बोला...; राज ठाकरे कडाडले, काय काय म्हणाले?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election Result 2026 : गोकुळ कोल्हापूरची अस्मिता, त्याचे निर्णय कोल्हापूरमध्येच झाले पाहिजेत, गोकुळ निवडणूक जिंकताच सतेज पाटील म्हणाले...
98 मतं बाद झाली नसती तर आमचे 20 उमेदवार जिंकले असते, गोकुळ निवडणूक जिंकताच सतेज पाटील काय म्हणाले?
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Embed widget