Phaltan Doctor Suicide news: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी आता यांनी रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्यावर आगपाखड सुरु केली आहे. डॉक्टर तरुणीचा खून झाला की तिची आत्महत्या (Suicide news) झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. मयत डॉक्टर ही व्यवस्थेचा बळी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी लावली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. फलटणमध्ये असे वातावरण असल्यास नवीन उद्योगधंदे येतील का, असा सवाल रामराजे नाईक निंबाळकर यांनी विचारला. फलटण येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. काल रात्री त्यांनी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नाव न घेता त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. (Satara News)
या दिवाळीत घडलेल्या घटनेमुळे भाऊबीजेनंतर माझी मनस्थिती ठीक नाही. फलटणमध्ये जी घटना घडली ती आपल्याला न शोभणारी झाली आहे. प्रल्हाद साळुंखे पाटील याला मी हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. या षडयंत्रात माझा सहभाग असेल तर आणि तुमच्यात हिंमत असेल तर माझं नाव घेऊन दाखवा. कुणीही ताणायचा प्रयत्न करु नये. हिंमत असेल तर माझं नाव घ्या, मग मी 1985 पासूनचा इतिहास बाहेर काढतो. ज्याने त्याने ठरवावे कोणाच्या सांगण्यावरुन किती बोलावे. मी कुणाला घाबरत नाही. तुमच्या मास्टरमाईंडला तर चुकून घाबरत नाही. मी 77 वर्षाचा आहे मला तुरुंगात टाकायची भाषा करता. तुरुंगात बसून तुला थर्ड लावीन. तू फलटणमध्ये कसा राहतो, ते मी बघतोच, असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
आगवणे कुटुंबातील पत्नीला सांगितले जाते की, आम्ही आरोप माघारी घेतो तू रामराजेंचं नाव घ्यायचं. फलटणच्या प्रांत मॅडम यांना नम्र विनंती तुम्ही कार्यकर्ता नाही. आधीच्या डीवायएसपी धस सारखी अवस्था तुमची होऊ देऊ नका. आंधळे मॅडम उबाठा गटाच्या आहेत. माझी तिची ओळख नाही, मी कोणत्या पक्षाचा आहे मलाच माहिती नाही. या लढाईत मी तुरुंगात जाव असं वाटत असेल तर तोही त्याग करायला मी तयार आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले.
Ranjisingh Naik Nimbalkar: नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या या नावाच्या ब्रँडची अब्रू घालवली; रामराजेंचा अप्रत्यक्ष टोला
या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. सनातन धर्माची व्याख्या माहिती आहे का? आता आपणच खाकी पँटी घालून सनातन धर्मात सहभागी होऊ. एक वर्ष झाले नाही तोच या ठिकाणचे आमदार शरद पवारांचे राष्ट्रवादी त्यांनीच काढली असा वागतोय. शनीला साडेसाती लावणारा माणूस तुमच्या आयुष्यात कधीही भेटणार नाही. तुम्ही फक्त माझं नाव फक्त घ्या मी वाटच पाहतोय. आज फलटण नगरपालिकेचा नारळ फुटला, असं समजा. माझं वय 78 आहे, माझ्यासमोर त्यांचं वय किती आहे? मात्र त्यांचा बुद्ध्यांक जो ऐकीव आहे तो मायनस आहे हे नक्की. नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या या नावाच्या ब्रँडची अब्रू घालवली, असा टोला रामराजे यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना लगावला.
Sushma Andhare in Phaltan: सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाणार, पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आज सुषमा अंधारे फलटण येथे पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान सुषमा अंधारे पोलीस ठाण्यात पोहोचतील. फलटण पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी जमण्याचा आवाहन सुषमा अंधारे यांनी नागरिकांना केले आहे.
आणखी वाचा