Devendra Fadnavis on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय. दरम्यान, हा कायदा कधी पास होणार? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे मतं मांडली आहेत. मराठा समाजाला आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पास झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी विधानभवन परिसरात जल्लोष केलाय यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आरक्षण कधी लागू होणार?
आता मराठा आरक्षणाचा कायदा पास झालाय. त्यामुळे, ज्या ठिकाणी जाहिराती निघतील तेथे मराठा समाजासाठी आरक्षण लागू होईल, असं स्पष्ट मतं देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मांडले. दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले. दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षण देता यावे यासाठी मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र यावर काम केले. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण देणे, योग्य ठरेल, असे न्यायमूर्ती शुक्रे म्हणाले होते. मी राज्य मागासवर्गीय आयोगाचा मी आभारी आहे. विरोधी पक्षांचे आभार मानतो त्यांनी एकमताने या विधेयकाला पाठिंबा दिला. शिवाय कर्मचाऱ्यांचेही आभार त्यांनी सर्वेसाठी दिवसरात्र काम केले.
अजित पवार यांना बाहेर जायचे होते
अजित पवार यांना अर्जंटली बाहेर जायचे होतं. त्यामुळे ते उपस्थित नव्हते. 10 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आम्ही सभागृहात ठेवला होता. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर केले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही. विरोधी पक्षाचे काम आहे विरोध करणे. आम्ही कायदा आणला तेव्हा त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या