एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : अमित शाहांचं भाषण पूर्ण ऐकलं असतं तर त्यांची थोबाडं काळी झाली असती; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis On Amit Shah : जरांगे यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस मेरीटवर निर्णय घेतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेसंबंधी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका होत असताना मुख्यमंत्र्यांनी आता त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांचं भाषण विरोधकांनी पूर्ण ऐकलं असतं तर अशी टीका झालीच नसती. अमित शाह काय बोलले हे पूर्ण ऐकले असते तर यांची थोबाडं काळी झाली असती, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. 

नवी मुंबईतल्या राजभाषा संमेलनात अमित शाहांनी हिंदी विरोधकांवर हल्लाबोल केला होता. त्यामध्ये महाराष्ट्र ही सगळ्यात मोठी बहुभाषी भूमी असल्याचं अमित शाहांनी म्हटलं. मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकायला विरोध करणारे पाप करत आहेत, असंही अमित शाह म्हणाले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांनीही एक ट्वीट करत अप्रत्यक्षपणे अमित शाह यांच्यावर टीका केली असल्याचीही चर्चा आहे.

या सगळ्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर अशी टीका झाली नसती. महाराष्ट्रात मराठीच कशी योग्य आहे हे अमित शाहांनी सांगितलं, मातृभाषेचं महत्वही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील लोक बहुभाषिक आहेत याचा अर्थ असा नाही की माझी मातृभाषा बदलेल. सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि त्यावर टीका करायची हे योग्य नाही. अमित शाह काय बोलले ते पूर्ण ऐकलं असतं तर यांची थोबाडं काळी झाली असती.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक मोजक्या शब्दात पोस्ट केली आहे. यामध्ये कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच... असं राज ठाकरे म्हणाले. सध्या राज ठाकरेंच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील हिंदी संमेलन पार पडले. या संमेलनात महाराष्ट्र बहुभाषिक असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या टीकेचा रोख अमित शाहांच्या अध्यक्षतेखालील हिंदी संमेलनाकडे आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

मनोज जरांगे यांच्यावर प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. ⁠पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ⁠पुन्हा अर्ज केला आहे मेरीटवर निर्णय घेतला जाईल. मुंबई-पुण्यात गणेशोत्सव हा मोठा सण असतो. या काळात कायदा सुव्यवस्था महत्त्वाची आहे. मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. काही प्रश्न कोर्टात आहेत.

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांचेही नाव आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री म्हणाले की, दिशा सालिअन केससंदर्भात मी एफआयआर पाहिली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयनं एफआयआर केली. त्यावर आपण तर्कवितर्क करणं योग्य नाही.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar NCP on Delimitation: डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांच्या पक्षात नाराजी, दोन आमदार अन् एक खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांच्या पक्षात नाराजी, दोन आमदार अन् एक खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Sharad Pawar Breach Candy Hospital : मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या भेटीला
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या भेटीला
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: 'शरद पवारांनी भाजपशी हात मिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही', संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
Maharashtra Live blog updates: 'शरद पवारांनी भाजपशी हात मिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही', संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Congress on Sharad Pawar: बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
Embed widget