एक्स्प्लोर

Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार

कनेक्टींग लिंक संदर्भात 7 हजार पाण्यात गेले हा माझा अपमान नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, त्या पसरवणं हा महाराष्ट्राचाच अपमान आहे.

मुंबई : राज्यात गेल्या 4 दिवसांपासून मिसिंग लिंक (Missing Link) चांगलाच चर्चेत आला असून मिसिंग लिंकवर कोसळेलेल्या दरड दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहातून विरोधकांवर हल्लाबोल केला. मिसिंग लिंकसंदर्भाने टीकाकारांना लक्ष्य करताना, एकवेळ माझा अपमान करा पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, असे फडणवीसांनी म्हटले. त्यावरुन, मनसेप्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुख्यमंत्र्‍यांना लक्ष्य केले. मिसिंग लिंकवरुन बोलल्यावर तुमचा अपमान कसा झाला? असा सवाल राज ठाकरेंना विचारला. तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ना तू, मग हिंदीत का बोलता? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर, आता फडणवीसांनी मिमिक्री आर्टिस्ट म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला. 

कनेक्टींग लिंक संदर्भात 7 हजार पाण्यात गेले हा माझा अपमान नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, त्या पसरवणं हा महाराष्ट्राचाच अपमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला सभागृहात प्रत्युत्तर दिलं. तसेच, मिमिक्री आर्टिस्ट म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरही पलटवार केला. मी हिंदीत बोललो, 'भाडे ते टट्टू' म्हटल्यावर काहींना दु:ख झालं. त्यामुळे, ⁠जाऊन मी अभ्यास केला, भाडे टे टट्टू या शब्दाला आता सुसंस्कृत भाषेत 'भाटक गदर्भ' म्हणतो, तरीही कोणाला समजलं नसेल तर सुपारीबाज... असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला.

मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले, हिंदीत का बोलतो?

मी काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो, मी तर टोपी फेकली होती पण अनेकांना का लागली मला समजलं नाही. मी एक वाक्य हिंदीत बोललो, ज्यांना समजायला पाहिजे त्यांच्यासाठी बोललो, पण दुसऱ्यालाच मिर्ची लागली. पण, आमचे ⁠मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले हिंदीत का बोलले? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सभागृहातून लगावला. तसेच, ते ⁠आमचे मित्र आहेत, ते मित्र असल्यामुळे राजकारणात आम्हाला त्यांच्यापासून काही धोका नाही. पण, ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं अशी खिल्ली देखील फडणवीसांनी राज ठाकरेंची उडवली.  

हेही वाचा

मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Vinayak Raut: विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?
विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget