नागपूर : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेतृत्त्वाकडे तक्रार केल्याचं समोर आलं होतं. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे नेते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करणार असल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांच्याकडून त्यांची भूमिका समोर आली आहे. नितेश राणे हिंदुत्वाबाबत बोलताना तडफेनं बोलतात, कधी कधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात, नारायण राणे आणि स्वत: त्यांच्याशी चर्चा केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजप आमदार नितेश राणे यांनी अलीकडच्या काळात मुस्लीम समाजाबाद्दल केलेल्या वक्तव्यांबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांशी बोलणार असल्याचं कळतंय. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दिल्लीतील नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती होती. अजित पवार यांनी कुठेही तक्रार करावी, हिंदुत्वाबाबत तडजोड करणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं. यासर्व प्रकरणावर भाजपचे राज्यातील नेते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे. नितेश राणेंबाबत देवेंद्र फडणवीस बोलताना म्हटलं की, नितेश राणे हिंदुत्वाकरता काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत, ते अतिशय तडफेने हिंदुत्वाचे विषय मांडतात. अर्थात हे विषय मांडताना कधी कधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात.त्यासंदर्भात नारायणराव राणे यांनी आणि मी स्वत: त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे आणि राज्याच्या नेतृत्त्वाकडे अशी बेताल वक्तव्य करणं बरोबर नाही, हे चुकीचं चाललंय याबाबत नाराजी व्यक्त केली हे खरं असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो : नितेश राणे
नितेश राणे यांनी सांगलीतील शिराळा येथे बोलताना पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो असं म्हटलं. तुम्ही तुमची ताकद दाखवा, आमची ताकद दाखवायला मैदानात येतो, असं नितेश राणे म्हणाले.
अजित पवार यांच्याकडून वाचाळवीरांना दम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच दम दिला. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या बुलढाणा येथील कार्यक्रमात वाचाळवीरांना दम दिला. सत्ताधारी असो विरोधक असो वाचाळवीरांनी आपल्या मर्यादा पाळाव्यात. आपण शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहतो.कुठंही वेडीवाकडी विधान करुन मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला आणि घटक पक्षांना अडचणीत आणू नये, असं अजित पवार म्हणाले.
संजय गायकवाड, अनिल बोंडे त्यांच्या वक्तव्यावर ठाम
अजित पवार यांनी महायुतीतील वाचाळवीरांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिल्यानंतरही आमदार संजय गायकवाड, खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं.
इतर बातम्या :
Ajit Pawar on Sanjay Gaikwad : मर्यादा पाळा! Ajit Pawar यांनी भर सभेत संजय गायकवाडांना झापलं