Ajit Pawar on Sanjay Gaikwad : मर्यादा पाळा! Ajit Pawar यांनी भर सभेत संजय गायकवाडांना झापलं

Continues below advertisement

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. अजित पवार यांचा फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह मजकूर असणारे फेसबुक पेज फॉलो करण्यात आल्याने पक्षाने याबाबत संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आज या संदर्भात सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून जाणीवपूर्वक फेक न्युज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे नोंद करुन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अधिकृत फेसबुकचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. अजित पवार यांच्या फेसबुक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धादांत खोटे, खोडसाळपणाचे आहे असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram