Raju shetti on Loksabha Election : लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल (Loksabha Election Result) हाती आले आहेत. काल रात्री उशीरापर्यंत अनेक ठिकाणी मतमोजणी सुरु होती. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडं महायुतीला जोरदार फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या निवडणुकीत हातकणंगले लोकभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली होती. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांनी पराभवाचा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने (Dhairsheel Mane) विजयी झाले आहेत. दरम्यान पराभवानंतर राजू शेट्टींनी एक भावनीक पोस्ट करत माझं काय चुकलं! शेतकऱ्यांनो तुम्हीही... अशा स्वरुपाची पोस्ट केली आहे.


हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची मानली जात होती. या मतदारसंघात तिरंगी लढत होती. धैर्यशील माने, सत्यजीत पाटील आण राजू शेट्टी असा सामना होता. यामध्ये धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, शेततऱ्यांच्या प्रश्न घेऊन लढणारे राजू शेट्टी यांनी क्रमांक तीनची मते मिळाली. त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर राजू शेट्टींनी एक भावनीक पोस्ट केली आहे. नेमकं काय म्हणालेत राजू शेट्टी ते पाहुयात.


नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?


पराभवानंतर राजू शेट्टी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी माझं काय चुकल! प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांनो तुम्हीही… असं म्हणतं पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, या मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी विजयाचा दावा केला होता. सर्वसामान्य शेतकरी गरीब कष्टकरी वर्ग माझ्या पाठीशी असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं होतं. मात्र,  या मतदारसंघातील जनतेनं पुन्हा धैर्यशील माने यांनाचं विजयाचा कौल दिला आहे. माने हे 13426 मतांनी विजयी झाले आहेत.  


हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?


हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अत्यंत अटीतटीची ही लढत झाली. यामध्ये धैर्यशील माने हे फक्त 13426 मतांनी विजयी झाले आहेत. माने यांना एकूण 520190 मते मिळाली तर सत्यजीत पाटील यांना एकूण 506764  मते मिळाली. तर राजू शेट्टींना एकूण 179850 मते मिळाली. या निवडणुकीत राजू शेट्टींचा तब्बल 340000 मतांनी पराभव झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी