AAP National Council Meeting: आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर रविवारी (18 डिसेंबर) आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना संबोधित करून पक्षाच्या व्हिजनविषयी केजरीवाल यांनी माहिती दिली आहे. 2027 मध्ये गुजरातमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, देवाने आम आदमी पक्षाला भारताची व्यवस्था सुधारण्यासाठी निवडले आहे. गेल्या 5 ते 7 वर्षात दिल्लीत 12.30 लाख लोकांना रोजगार दिल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे पंजाबच्या आप सरकारने 21 हजार लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत, असं ही ते म्हणाले आहेत.


अरविंद केजरीवाल म्हणाले की, बेरोजगारी आणि महागाई दूर करता येते हे दिल्लीने दाखवून दिले आहे. पण त्यामागे चांगला हेतू असला पाहिजे. ते म्हणाले की, लोक मला विचारतात की आम आदमी पक्षाचा व्हिजन काय आहे? पण आम आदमी पक्षासाठी नाही तर या देशासाठी माझं व्हिजन काय आहे? येत्या 5 ते 10 वर्षात आपला देश कुठे असेल, याचा आपण विचार करतो, असे ते म्हणाले. मात्र आम आदमी पक्ष या देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करेल. ते म्हणाले की, आम्हाला असा देश हवा आहे जिथे सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी असेल. जाती-धर्माच्या नावावर हिंसाचार होणार नाही.


तर देश कधीच प्रगती करू शकत नाही : केजरीवाल 


अरविंद केजरीवाल म्हणाले की, देशात जर लोकांनी एकत्र काम केले नाही तर देश कधीच प्रगती करू शकत नाही. देश 130 कोटी लोकांच्या कुटुंबासारखा आहे. देशाचे तुकडे करण्याचा विचार करणाऱ्या कोणत्याही पक्षाला किंवा संघटनेला देशाची प्रगती कधीच नको असते. तिला या देशाला 19व्या शतकात घेऊन जायचे आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्हाला असा देश हवा आहे जिथे कोणीही उपाशी झोपणार नाही आणि सर्वांना पोटभर भाकर मिळेल. अशा भारताची कल्पना करूया जो केवळ आपल्या देशासाठीच नाही तर जगातील गरीब देशांना अन्न पुरवण्यास सक्षम आहे. आपला देश जगातील शिक्षणाचा केंद्र बनला पाहिजे.


इतर महत्वाची बातमी:


Maharashtra Gram Panchayat Election 2022 : नवरी मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर, 104 वर्षांच्या आजोबांनीही बजावला हक्क; गावगाड्यात मतदानाचा उत्साह