Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील फारोळा गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पथकासह श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली आहे. तर भीमराव खरनाळ (वय 65 वर्षे) आणि शशिकला खरनाळ (वय 58 वर्ष) असे मृत वृद्ध दांपत्याचे नावं आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद-पैठण महामार्गावर असलेल्या फारोळा गावातील विजयनगर येथे भीमराव खरनाळ आणि शशिकला खरनाळ हे दाम्पत राहत होते. दरम्यान काल मध्यरात्री अचानक घरात अज्ञात व्यक्तीने घसून त्यांना मारहाण केली. त्यानंतर दोघांचा गळा दाबून हत्या केली. आज सकाळी हि घटना उघडकीस आली आहे. तर घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच दोन्ही वृद्ध दांपत्याचे मृतदेह बिडकीन येथील शासकीय घाटी रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
चोरीच्या उद्देशाने हत्या...
पोलिसांनी घटनास पाहणी केली आहे. तर श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले होते. मृत महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा सर्व प्रकार चोरीच्या उद्देशाने घडला असून, विरोध केला असता हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्वच बाजूने तपास करण्यात येत आहे.
परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी...
वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर परिसरातील सीसीटीव्हीची देखील पोलीस तपास करत आहे. विशेष म्हणजे घटनास्थळ औरंगाबाद-पैठण रोडपासून हाकेच्या अंतरावर असल्याने या रोडवरील दुकानातील सीसीटीव्हीची देखील पोलीस पाहणी करत आहे.
परिसरात खळबळ...
आज जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. दरम्यान फारोळा गावाला खेटून असलेल्या बिडकीन गावात देखील आज मतदान होत आहे. यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. दरम्यान याचवेळी वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची बातमी गावात कळल्याने खळबळ उडाली आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
Aurangabad News: सांडपाण्यावरून झालेल्या वादातून थेट गोळीबार,पोलिसांत गुन्हा दाखल