Delhi MCD Polls Exit Polls: दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक पार पडली असून याचे निकाल 7 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा दावा केला जात आहे. इंडिया टुडे ग्रुप अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्ष एमजीडी निवडणुका जिंकणार आहे. आकडेवारीनुसार, आपला निवडणुकीत 149 ते 171 जागा मिळत आहेत.
तर या एक्झिट पोलनुसार भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीत भाजपला 69 ते 91 जागा मिळत आहेत. तर काँग्रेसच्या खात्यात 03 ते 07 जागा येत आहेत. तसेच इतर 05 ते 09 जागांवर विजय नोंदवत आहेत. व्होट शेअरिंगबद्दल बोलायचे झाले तर आम आदमी पक्षाला 43 टक्के, भाजपला 35 टक्के आणि काँग्रेसला 10 टक्के मते मिळू शकतात, असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.
दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल दोन दिवसांनी म्हणजे 7 डिसेंबरला लागणार आहेत. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलच्या निकालानुसार, जर आपण एमसीडी निवडणुकीबद्दल बोललो तर यावेळी बेरोजगार, मजूर आणि रिक्षा चालकांनी आम आदमी पक्षाला बंपर मतदान केले आहे. या आधारे एक्झिट पोलच्या निकालात एमसीडीमध्ये आपला सत्ता मिळताना दिसत आहे. जाणून घेऊया कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान झाले...
- बेरोजगार - 43 टक्के, आम आदमी पक्ष. भाजपला 35 टक्के आणि काँग्रेसला 12 टक्के.
- मजूर - 46 टक्के आम आदमी पक्ष. भाजपला 32 टक्के आणि काँग्रेसला 11 टक्के.
- रिक्षा/टॅक्सी चालक - 44 टक्के आम आदमी पक्ष. 36 टक्के भाजप आणि 11 टक्के काँग्रेस.
- व्यावसायिक - 40 टक्के आम आदमी पक्ष. 38 टक्के भाजप आणि 10 टक्के काँग्रेस.
इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एमसीडी निवडणुकीत भाजपला 35 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाला 43 टक्के, तर काँग्रेसला फक्त 10 टक्के मते मिळत आहेत. विशेष म्हणजे दिल्ली एमसीडीवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपचा कब्जा आहे. 2007 पासून भाजप सातत्याने निवडणुका जिंकत आले आहे. पण यावेळी आम आदमी पक्ष भाजपला टक्कर देत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीत आपला मोठी आघाडी मिळाली आहे.