PM Modi Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण  झाले आहे.  पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी वाराणसीत सकाळी 11 वाजता दाखल  झाले. सुरुवातीला त्यांनी काशीच्या कालभैरव मंदिरात आरती केली. त्यानंतर क्रूझमधून त्यांनी गंगासफर देखील केली. त्यानंतर मोदींनी गंगा नदीत स्नान करून अर्घ्य अर्पण केलं.  नंतर त्यांनी काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात बसून पूजा आणि अभिषेकही केला. त्यानंतर जाहीर कार्यक्रमात मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण केले आहे. 
 
पंतप्रधान मोंदी संध्याकाळी 6 वाजता मोदी गंगा आरती करणार आहे.   8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडोरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर दोन वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत या कॉरिडॉरचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. यासाठी 445 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 

यावेळी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. हर हर महादेव म्हणत पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरवात केली. काशी विश्वनाथ कॉरिडोरसाठी जागा देणाऱ्या काशीतील जनतेचे, उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीमचे पंतप्रधान मोदींनी यावेळी अभिनंदन केले. पवित्र गंगा नदी काठावर भारताची भव्य संस्कृती वसली आहे. काशी विश्वानाथ मंदिराचा परिसर पूर्वी खूप छोटा होता. पण आता काशीतील जनतेच्या पुढाकाराने आता हजारो भाविक थेट गंगा स्नान करून काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊ शकतील. दिव्यंग व्यक्तींनाही काशी विश्वनाथाचे दर्शन घेणं सुलभ होणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन 339 कोटी रुपये खर्च आलाय 
  • दररोज जवळपास 2000 मजुरांनी काम केलंय.
  • कॉरिडोरचा संपूर्ण परिसर जवळपास 5 लाख चौरसफुटांपर्यंत पसरला आहे. 
  • कॉरिडोर तयार करण्यासाठी जवळपास 400 इमारतींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. 
  • पंतप्रधान मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट तयार करण्यासाठी 1 वर्ष नऊ महिन्यांचा काळ लागला आहे.  

असं आहे काशी विश्वनाथ धाम :