Dailyhunt Trust of Nation survey : डेलीहंट ट्रस्ट ऑफ नेशनच्या सर्वेक्षणात नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या सर्वेक्षणात पुढील पंतप्रधान म्हणून कोणाला पाहायचे आहे? यावर 64 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) सर्वेक्षणाचा निकाल डेलीहंट सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे.


डेलीहंटने एकूण 11 भाषांमध्ये लोकसभा निवडणूक 2024 चे सर्वेक्षण केले आहे. यात एकूण 77 लाख लाकांचे मत घेण्यात आले आहे. सध्याच्या सरकारच्या कामावर जनता किती समाधानी आहे? हे जाणून घेणे या सर्वेक्षणाचा उद्देश होता. सर्वेक्षणाचा निकाल हा मोदी सरकारच्या बाजूने आहे. यात एकूण 61 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) कामावर समाधान व्यक्त केले आहे. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल, असा एकूण 63 टक्के लोकांचा विश्वास असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.


या आहेत यंदाच्या निवडणुकीतील खास गोष्टी 



  • डेलीहंटच्या सर्वेक्षणानुसार, पाचपैकी तीन लोकांनी (64%) नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहे. तर केवळ 21.8 टक्के लोकांना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे. 

  • सर्वेक्षणातील तीनपैकी दोन उत्तरदात्यांचा असा विश्वास आहे की, 2024 मध्ये भाजप / एनडीए युती लोकसभा निवडणूक जिंकेल.

  • दिल्लीत पंतप्रधान मोदी 57.7 टक्के मतांसह आघाडीवर आहेत.राहुल गांधींना 24.2 टक्के मते देण्यात आली. तर योगी आदित्यनाथ यांना 13.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. 

  • डेली हंटच्या सर्वेक्षणात यूपीमध्ये यंदाच्या निवडणुकीत पीएम मोदींना पहिली पसंती आहे. त्यांना 78.2 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधी यांना केवळ 10 टक्के मते मिळाली आहेत.

  • पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींना 62.6 टक्के मते मिळाली. राहुल गांधींना 19.6 टक्के आणि प्रादेशिक नेत्या ममता बॅनर्जी यांना केवळ 14.8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. 


अशी आहे दक्षिणेकडील राज्यांतील परिस्थिती 



  • तामिळनाडूमध्ये राहुल गांधींना 44.1 टक्के तर नरेंद्र मोदींना 43.2 टक्के पाठिंबा मिळत आहे. 

  • केरळमध्ये मोदी आणि राहुल यांच्यात चुरशीची लढत आहे. या सर्वेक्षणात पीएम मोदींना 40.8 टक्के आणि राहुल गांधींना 40.5 टक्के मते मिळाली.

  • तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना 60.1 टक्के मते मिळाली आहेत. तर राहुल गांधींना 26.5 टक्के मते मिळाली आहेत. तर एन. चंद्राबाबू नायडू 6.6 टक्के मतांनी पिछाडीवर आहेत.

  • आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींना 71.8 टक्के मते मिळाली. राहुल गांधी यांना 17.9 टक्के मते मिळाली तर एन. चंद्राबाबू नायडू यांना केवळ 7.4 टक्के मते मिळाली आहेत.


परराष्ट्र धोरणाबाबतही  एनडीएच्या कामावर समाधान


परराष्ट्र धोरणाबाबतही करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 64 टक्के लोकांनी एनडीएच्या कामावर समाधान व्यक्त केले आणि त्याचे कौतुक केले.


आणखी वाचा 


महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!