मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असून त्याआधी कुणाची ताकद किती याचा अंदाज येणार आहे तो आज होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election). जागा 11 पण उमेदवार 12 असल्याने एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित. विधानपरिषद निवडणुकीला अवघे काही तास राहिलेले असताना पराभूत होणारा तो बारावा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सुरुवाताली ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांच्या रुपात 12 वा उमेदवार दिला आणि निवडणुकीत रंगत आली. त्याचा फटका सत्ताधारी गटाला बसणार की विरोधकांना हे काहीच तासांमध्ये स्पष्ट होईल. 12 वा उमेदवार देऊन, उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शरद पवारांनी अजित पवारांना खिंडीत गाठण्याचं राजकारण केल्याचीही जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सूत्रं हाती घेतल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे 3-4 आमदार क्रॉस व्होटिंग करणार?
दगाफटका होऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसचे 3-4 आमदार क्रॉस वोटिंग करणार असून ते फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये आहेत, आम्ही त्यांना मोजतच नाही असं जयंत पाटील म्हणाले. तर काँग्रेसमधील ते डाऊटफुल आमदार माहीत आहेत, त्या आमदारांची व्यवस्था काँग्रेस पक्ष करेल असं काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणालेत.
भाजपाचे उमेदवार
- पंकजा मुंडे
- परिणय फुके
- अमित बोरखे
- योगेश टिळेकर
- सदाभाऊ खोत
शिवसेना (एकनाथ शिंदे)
- भावना गवळी
- कृपाल तुमणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
- राजेश विटेकर
- शिवाजीराव गर्जे
काँग्रेस
- डॉ. प्रज्ञा राजीव सातव
शेतकरी कामगार पक्ष (शरद पवार समर्थन)
- जयंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- मिलिंद नार्वेकर
जिंकण्यासाठी 23 मतांचा कोटा
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा असेल. विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाची किती ताकद असेल आणि अकरावी जागा निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कशी करावी लागणार याची आकडेवारी जाणून घेऊयात,
महाविकास आघाडी
राष्ट्रवादी शरद पवार - 12
उद्धव ठाकरे शिवसेना - 15 + 1 शंकरराव गडाख = 16
काँग्रेस - 37
एकूण - 65
महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडेल.
छोटे घटक पक्ष
1) बहुजन विकास आघाडी - 3
2) समाजवादी पक्ष - 2
3) एमआयएम - 2
4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1
5) शेतकरी कामगार पक्ष - 1
एकूण - 9
महाविकास आघाडी एकूण आमदार - 65
महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकणारे पक्ष
1) समाजवादी 2
2) एमआयएम 2
3) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1
4) शेतकरी कामगार पक्ष 1
महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पक्ष लक्षात घेऊन एकूण आमदार - 71 आमदार
महायुती आमदारांची संख्या
राष्ट्रवादी (अजित पवार) 41
भाजपा - 103
शिवसेना - 38
महायुती पाठींबा देणारे आमदार
राष्ट्रवादी (अजित पवार)
1) देवेंद्र भुयार
2) संजयमामा शिंदे
राष्ट्रवादी + अपक्ष - 43
भाजपला पाठिंबा देणारे आमदार
1) रवी राणा
2) महेश बालदी
3) विनोद अग्रवाल
4) प्रकाश आवाडे
5) राजेंद्र राऊत
6) विनय कोरे
7) रत्नाकर गुट्टे
भाजप + मिञ पक्ष आणि अपक्ष- 103+ 7 = 110
एकनाथ शिंदे शिवसेना- 38
पाठिंबा देणारे आमदार - 10
1) नरेंद्र भोंडेकर
2) किशोर जोरगेवार
3) लता सोनवणे
4) बच्चू कडू
5) राजकुमार पटेल
6) गीता जैन
7) आशीष जैसवाल
8) मंजुळा गावीत
9) चंद्रकांत निंबा पाटील
10) राजू पाटील
एकूण - शिवसेना + मिञ पक्ष आणि अपक्ष = 38+ 10 = 48
महायुती एकूण आमदार - 201
महायुतीला आपले नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी सहा मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांवर महायुती या सगळ्यासाठी अवलंबून असेल.
ही बातमी वाचा: