Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणायचा उद्याचा शेवटचा दिवस असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हेही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी कुटुंबाच्या पाठिंब्याने शुक्रवारी (30 सप्टेंबर) उमेदवार म्हणून अर्ज दाखल करू शकतात. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर हेही शुक्रवारीच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


यातच काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसच्या G-23 गटाच्या नेत्यांनीही गुरुवारी बैठक पार पडली. आनंद शर्मा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र हुडा यांच्यासह अनेक नेते या बैकठकीला उपस्थित होते. सूत्रांचे म्हणणे आहे की, G-23 गट देखील अध्यक्षपदासाठी उमेदवार उभे करू शकते. शुक्रवारी जी-23 गटाने दुसरी बैठक बोलावली आहे.


काँग्रेस खासदार शशी थरूर, दिग्विजय सिंह यांच्यानंतर आता G-23 गटही उमेदवार उभे करण्याची चर्चा आहे. त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे हे देखील गांधी घराण्याची पसंती म्हणून निवडणुकीत उतरू शकतात. या सर्व घडामोडीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अधिक रंगली आहे. मल्लिकार्जुन खरगे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या जवळच्या सूत्राने आधीच दिले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या तर पक्षाचे ज्येष्ठ नेते एम मल्लिकार्जुन खरगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे सूत्रांनी बुधवारी सांगितले होते.


30 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करत येईल 


मल्लिकार्जुन खरगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांसारख्या विरोधी नेत्यांशी चांगले संबंध आहेत. ज्यामुळे त्यांना अतिरिक्त फायदे मिळतील. हिंदी भाषिक राज्यांमध्ये त्यांचा जनाधार आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार (30 सप्टेंबर) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर 8 ऑक्टोबरपर्यंत नाव मागे घेतलं जाऊ शकत. 17 ऑक्टोबरला निवडणुका होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


नाना पटोले यांनी केली राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी! म्हणाले भारत जोडो यात्रा ही रामाच्या वनवासाप्रमाणेच
Congress President Election: गेहलोत यांची 'एक्झिट', दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांच्याशिवाय कोण-कोण शर्यतीत, जाणून घ्या