पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याचा दौऱ्यावर आहेत. याच विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. आता अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोलापूर शहराशी जोडलेला बाबासाहेबांचा इतिहास आहे. मात्र जात पात धर्म करणाऱ्या सरकारमुळे, नरेंद्र मोदींमुळे संविधानाला संकट निर्माण झालं आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. सोलापूर शहरातील पार्क चौक येथे संविधान भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक चेतन नरोटे आदी उपस्थित होते.  


मोदी सरकारमुळे लोकशाही धोक्यात 


या कार्यक्रमात बोलता त्या म्हणाल्या आहेत की, ''डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान ही अनमोल देणगी दिली आहे. आणि केंद्रातील भाजप आणि नरेंद्र मोदी यांमुळे संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यात आली.''


प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, '''जात पात करणाऱ्या मोदी किंवा भाजपा सरकारने भारत देशात  एक प्रकरचे संकट निर्माण केले आहे. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर तरुणांनी शेवटच्या श्वाशापर्यंत लोकशाहीसाठी लढणे गरजेचे आहे.'' यावेळी कार्यक्रमाला उपस्थित लोकांना उद्देशून त्या म्हणाल्या की, ''डॉ आंबेडकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथी पर्यंत मर्यादित न राहता शेवट पर्यंत लढून ही लोकशाही टिकवावी लागेल. आता राज्यकर्ते काहीही करू शकणार नाहीत जनताच यांना जागा दाखवून देईल"


महत्वाच्या बातम्या