Nana Patole on Praful Patel : भंडारा गोंदिया (Bhandara-Gondia) जिल्ह्याच्या लोकांना त्यांच्याकडून (प्रफुल्ल पटेल) फार काही अपेक्षा नाहीत. त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेची मतं घेऊन, त्यांना मोठं मोठी स्वप्न दाखवली. ती स्वप्न त्यांनी कधीच पूर्ण करण्याचं काम केलं नाही, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर टीका केली. पाच वर्ष सत्तेची मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकणं आणि तिथूनच श्रीमंत होणं असं काम या लोकांनी केल्याचे पटोले म्हणाले. 


 प्रफुल्ल पटेल यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याचा पटोलेंचा आरोप


भंडाऱ्यात काल विंडविल कंपनीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना ते भावी ते भावीचं राहणार असं वक्तव्य केलं होतं. यावर आज नाना पटोले यांनी भंडाऱ्यात प्रत्युत्तर देताना प्रफुल्ल पटेल यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याचा घणाघात आरोप केलाय.भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या लोकांना त्यांच्याकडून (प्रफुल पटेल) फार काही अपेक्षा नाहीत असेही पटोले म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांना खऱ्या अर्थानं या जिल्ह्यावर प्रेम असतं, विकासाच्या पद्धतीची भूमिका असती, तर त्यांनी मला आशीर्वाद दिला असता. पण, त्यांनी आता भावी....भावीचं राहणार असल्याचे पटोले म्हणाले. मी आतापर्यंत त्यांचं स्वप्नचं पूर्ण करत आलो आहे. त्यांनी माझ्या विरोधात जे काही षडयंत्र तयार केलेलं होतं त्या षडयंत्राला मागे टाकत गेल्याचे पटोले म्हणाले.


 भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या जनतेनं व मला सदैव आशीर्वाद दिला


भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या जनतेनं व मला सदैव आशीर्वाद दिलेला आहे. त्यांचे आज माझ्याबद्दलचे जे विचार आहेत, त्या विचाराला मी पूर्णपणे पलटवणार आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेच्या विश्वासात मी पुन्हा खरा उतरणार असल्याचे पटोले म्हणाले. भंडारा- गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचे गाजर हे जे स्वयंभू नेते करत होते. विकास काय असतो हे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला काही महिन्यातच कळणार असल्याचे पटोले म्हणाले.


रतन टाटा यांच्या जाण्यानं देशाचं फार मोठं नुकसान


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. देशाची औद्योगिक जडणघडण करणारी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानं देशाचा फार मोठं नुकसान झाल्याचे नाना पटोले म्हणाले.  क प्रसिद्ध उद्योगपती, देशासाठी समर्पित असे उद्योगपती, नि:स्वार्थ देशाची सेवा करणारे उद्योगपती.... नावातचं रतन....नवरत्न असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून देशाला उभा करण्यामागं औद्योगिक जडणघडण त्यांनी या देशात रोवली. असं हे महान व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही याचं दु:ख असल्याचे पटोले म्हणाले. 


लवकरच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार 


लवकरच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. काल भंडाऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी कंपनीच्या उद्घाटना प्रसंगी नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.  त्यावर नाना पटोले यांनी हे प्रफुल्ल पटेल यांच्यावर पलटवार करताना माझ्या विरोधात प्रफुल्ल पटेल यांनी षडयंत्र रचलं होतं. पण त्याला मी परतवून लावल्याचे वक्तव्य पटोलेंनी केलं.  


महत्वाच्या बातम्या: