Abuses To PM Modi: सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पारा वाढला असून कॉंग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांनी वापरलेल्या अपशब्दांवर जोरदार पलटवार केला. त्यांनी म्हटलंय की, कॉंग्रेसचे लोक नेहमीच शिव्या देत असतात. कॉंग्रेसच्या या शिव्या एके दिवशी मातीत मिसळून जातील. पंतप्रधान मोदींनी त्यांना देण्यात आलेल्या शिव्यांचा पाढा वाचताना सांगितले की, आतापर्यंत कॉंग्रेसने  त्यांना 91 वेळा शिव्या दिल्या.


नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कनार्टकमधील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचार सभेत कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या एका वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. खरगे यांनी कनार्टकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.  


यानंतर कर्नाटकमधील राजकारणाचा पारा वाढला आहे. कॉंग्रेसने मोदींना कोण-कोणत्या शिव्या दिल्याचा दावा केला जात आहे त्यावर एक नजर टाकूया, 


शिवी नंबर- 1 


कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनी 27 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक आक्षेपार्ह वक्तव्य करत टीका केली होती. खरगेंनी कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील एका निवडणूक सभेत मोदींची तुलना एका विषारी सापाशी केली.  


शिवी नंबर -2 


कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी  8 जानेवारी 2023  रोजी कर्नाटकमधील एक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टीक केली होती. त्यांनी मोदींची तुलना चक्क हुकूमशाहाशी केली होती. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टींसाठी मोदी-मोदी करणं हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. लोकशाहीत एका व्यक्तीला देव बनवाल, तर लोकाशाही राहत नाही. हा हुकूमशाहीकडे जाणारा मार्ग आहे.


शिवी नंबर- 3


गेल्यावर्षी  19 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानच्या अलवरमध्ये एका सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरेंनी पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना उंदराशी केली होती. ते म्हणाले की, चीनने केलेल्या हल्ल्यावर चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही केली होती, पण सरकार चर्चेसाठी तयार नाही. ते बाहेर वाघासारखं बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखी चाल खेळतात अशी विखारी टीका केली होती.  


शिवी नंबर-4


युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी याच्यावर सोशल मीडियावरून वैयक्तिक टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर एक विवादास्पद पोस्टमध्ये लिहिताना मोदींची तुलना हिटलरशी करत एक वादग्रस्त छायचित्रही पोस्ट केलं होत. ही आक्षेपार्ह पोस्ट 24 मार्च 2023 रोजी करण्यात आली होती. 


शिवी नंबर- 5. 


कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी जवळचे संबंध असणारे कॉंग्रसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलर, स्टॅलिन आणि मुसोलिनी यांच्यासारख्या हुकूमशाहाशी केली होती. अशा प्रकारचं आक्षेपार्ह ट्वीट 11 मार्च 2023  रोजी केलं होतं. यात त्यांनी इराकचा हुकूमशाहा सद्दाम हुसेन आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशीही  केली होती.



दरम्यान कॉंग्रेसने आतापर्यंत 2009 पासून ते 2023 या काळात पंतप्रधान मोदींना 91 वेळा शिव्या दिल्या आहेत असा दावा त्यांनी केला. याचा कर्नाटकच्या निवडणूक सभेत मोदींनी पाढाच वाचला आहे.