मुंबई :  रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी (Auto- Taxi Driver)  दिलासादायक बातमी आहे.   रिक्षा, टॅक्सी चालकांना ग्रॅच्युईटी देण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ग्रॅच्युईटीसाठी वर्षाला 300 रुपये भरावे लागणार, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी आपण कल्याणकारी मंडळ निर्माण केला आहे. लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. टॅक्सी चालकांना ग्रॅच्युएटी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे  वर्षाला तीनशे रुपये त्यासाठी तुम्हाला भरावे लागतील. याचे काही पैसे हे सरकार देणार आहे  यावर काम सुरू आहे. चालकांच्या  परिवाराला विमा संरक्षण दिले जाईल. ज्यांची मुलं आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनी सोबत एक करार केला आहे.  या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला पन्नास हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. आरोग्य विभाग पॉलिसी विस्तृत केली जाणार आहे. तसेच या चालकांचं मिनिमम कॅल्क्युलेशन आणि राज्य सरकारने दिलेले पैसे धोरण तयार होईल. ही गरीब लोक आहेत. हे सर्व सामान्यांचे सरकार आहे याचमुळे आम्ही ही योजना आणली आहे.


दादरमध्ये होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंकडून पाहणी, जुन्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम सुरु आहे.  याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,  सरकारमध्ये असताना त्यांना बाळासाहेबांबद्दल काही करता आलं नाही . आमच्या सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने समृद्धी महामार्ग सुरू केला. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आम्ही युद्ध पातळीवर पुढे नेत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हे सरकार आहे . या सरकारला लोकांनी पाठिंबा दिला आहे . जे आज बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात त्यांचे वोट शेअर 42 टक्के आहे आणि आमचे 48 टक्के आहे. काही लोक खोटं नरेटीव पसरवत आहेत.  लोक आमच्यासोबत आहेत.


रवींद्र वायकर यांच्या विजयामुळे विरोधक हैराण  : मुख्यमंत्री


उत्तर पश्चिम मुंबई निकालावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या ठिकाणी यांचा विजय झाला त्या ठिकाणचे ईव्हीएम योग्य आहे असे म्हणतात . जिथे हरले तिथे गडबड असल्याचे म्हणतात . रवींद्र वायकर यांच्या विजयामुळे विरोधक हैराण झाले आहे .  गिरे तो भी टांग उपर अशी यांची अवस्था आहे.


हे ही वाचा :


छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते :संजय राऊत