Chitra Wagh on Narendra Modi  : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची चीभ सातत्याने घसरताना दिसत आहे. चित्रा वाघ यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणजे वाघ आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लफडेबाज आहेत. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गिधाड आहेत, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. लातुरमधील एका मेळाव्यात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा पातळी सोडून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाचा म्हणून उल्लेख केला होता. पुन्हा एकदा चित्रा वाघ यांची चीभ घसरली आहे. 


सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आलेत


उद्धव ठाकरे , शरद पवार आणि या काँग्रेस वाल्यांना मोदी नको. सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आलेत. सध्या देशातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र झालेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. उदगीर येथील मेळाव्यात चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्या बोलत होत्या. या मेळाव्याला लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे देखील उपस्थित होते. 


सध्या देशातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र झालेत


उद्धव ठाकरे , शरद पवार आणि काँग्रेसवाल्यांना गिधाडाची उपमा दिली आहे. उद्धव ठाकरे , शरद पवार आणि या काँग्रेसवाल्यांना मोदी नको आहे. सध्या देशातील सगळे भ्रष्टाचारी एकत्र झालेत. हे सगळे गिधाड आपल्या वाघाला घेरायला आले असल्याची टिका चित्रा वाघ यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राने अडीच वर्षांपूर्वीच फोडलाय. पण छोट्या छोट्या आठवणी गोंडसच आहेत. ओवैसी होता आपल्या मातीमध्ये आला आणि औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी गेला होता, असंही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. 


कोणाचेही खा मटण कमळाचे दाबा बटन


तुमचा नवरा तुमच्या घरातली पुरुष मंडळी हे बाहेर जातात. विविध राजकीय पक्ष आमिष देत असतात. पुरुष मंडळी मटन खाऊन घरी आले की त्यांच्या कानात सांगा. कोणाचे ही खा मटण मात्र कमळाचेच दाबायचं बटन त्याच्या कानात हे सतत सांगत राहा. सकाळी, दुपारी आणि रात्री हाच विषय त्याला सांगायचा असा सल्ला चित्रा वाघ यांनी महिला मेळाव्याला उपस्थित असलेल्या महिलांना सांगितला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar on Sharad Pawar : आता चार दिवस सूनेचे आलेत, बायकोला मत द्या, भाषणं करुन पोट भरणार नाही, अजितदादांचा दौंडमध्ये हल्लाबोल