Eknath Shinde on Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव  झाल्यानंतर उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची स्वीकारली आहे. "मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. मी पक्ष नेतृत्वाला विनंती करतो की, मला सरकारमधून मुक्त करावे. मला विधानसभेसाठी काम करायचे आहे", अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


देवेंद्रजींनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देवेंद्रजींनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते. मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाखांहून अधिक मते मिळाली. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोटं बोला रेटून बोलं या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते. मात्र मतदारांनी या विरोधकांना तडिपार केले. 


मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे, पराभवाची कारणमीमांसा केली जाईल


पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे. पराभवाची कारणमीमांसा केली जाईल. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहे. देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन. अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही. जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 


शेतकऱ्यांच्या अपेक्षा आमच्याकडून पूर्ण झाल्या नाहीत : देवेंद्र फडणवीस 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपला किंवा महायुतीला जनतेने नाकारलं असं होणार नाही. समसमान मतं आम्हालाही मिळाली आहेत. मात्र अपेक्षेप्रमाणे आम्हाला कमी मते मिळाली आहे, हे आम्ही मान्य केले असून 2019 च्या तुलनेत अगदी मोजक्याच फ्रॅक्शनंने कमी मते आम्हाला मिळाली आहे. काही नरेटीव विरोधी पक्षांकडून सेट करण्यात आले त्याचा देखील आम्हाला फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे मुद्दे, मराठा आरक्षण, संविधान बदलाबाबत जे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आली. कदाचित त्याला आम्ही योग्य पद्धतीने रोखू शकलो नाही.


इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis : आचारसंहितेचे गणित चुकल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करता आल्या नाही; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती