Chhatrapati Sambhajinagar: मराठा आरक्षण आंदोलनाची मुदत संपली असली तरी सरकार यावर गांभीर्याने काम करत आहे. हैदराबादला नोंदी तपासण्यासाठी शिष्टमंडळ गेलं असून लवकरच शिष्टमंडळ मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेणार असल्याचं आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


'कुणी कुणावर दबाव आणत नाही ' असं म्हणत मनोज जरांगेंचा आरोप खोडण्याचा आमदार शिरसाट यांनी प्रयत्न केला. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी दबाव आणत असतील " असे जरांगे म्हणाले होते. 


सापडलेल्या नोंदी रद्द होणार नाही


मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार गांभीर्याने काम करत असून हैदराबाद नोंदी तपासायला शिष्टमंडळ गेलं आहे. यावर सोमवारी बैठक होणारअसल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सापडल्या असून सापडलेल्या नोंदी रद्द होणार नाहीत असेही ते म्हणाले.


थोडा वेळ मागे पुढे होत आहे. शिंदे काम करत असल्याचे जरांगेंनाही माहित असल्याचे ते म्हणाले.


जरांगे यांनी दिलेला अल्टिमेटम संपला


सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा अध्यादेश काढण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरंगे यांनी सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम दिला होता. यावर वीस तारखेला आंदोलक मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात आले. 


ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देणार आरक्षण


ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याचे आमदार शिरसाट यांनी सांगितले. मात्र लोक दोन्ही समाजात भांडण लावत असल्याचे सांगत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना टोला लगावला.


राऊतांची आरोग्य तपासणी करण्याची गरज: संजय शिरसाट


खऱ्या अर्थाने संजय राऊत यांचे आरोग्याची तपासणी करण्याची आता गरज आहे. त्यांच्या मानसिकतेची तपासणी करावी लागेल. आम्ही आमच्या पक्षाचा पाहू म्हणता दुसऱ्याच्या पक्षात डोकं घालण्याची त्यांना सवय लागली आहे असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊत यांना टोलावले.


विशाळगड अतिक्रमणाच्या उपोषणाआधी शिष्टमंडळ भेटले


दरम्यान, विशाळगड अतिक्रमण प्रकरणीही शिरसाटांनी भाष्य केले असून महाराजांच्या कोणत्याही गडावर ठेवणार नाही, सरकार सर्व अतिक्रमण काढतील, असे म्हणत २० तारखेला उपोषण करण्याची घोषणा केली त्यापूर्वी सरकारचे शिष्टमंडळ त्यांना भेटलं असल्याचे शिरसाट म्हणाले.


हेही वाचा:


आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांचा इतर मंत्र्यांवर दबाव? मनोज जरांगे यांचा आरोप, म्हणाले..