Navnath Waghmare on Sharad Pawar: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा आणि ओबीसी प्रश्न तापलेला असतानाच नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी शरद पवारांवर(Sharad Pawar) जोरदार निशाणा साधण्याचा दिसून आलाय. त्यावेळी शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला होता. आज तेच शरद पवार भांडण पाहण्याचं काम करतायत असं नवनाथ वाघमारे म्हणालेत. स्वतःच्या गद्दारीचा ठपका पुसण्यासाठी मुख्यमंत्री जरांगे यांचे लाड पुरवतात असेही ते म्हणाले. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेत नवनाथ वाघमारे बोलत होते.


राज्यात गेले काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न चांगलाच तापलेला दिसतोय. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारेही ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी झाले होते. तर वंचित बहुजनकडूनही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा राज्यभर काढण्यात आली. 


स्वतःच्या गद्दारीचा ठपका पुसण्यासाठी जरांगेंचे लाड


गेल्या दहा ते बारा महिन्यात समाजात वाद लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका करत स्वतःच्या गद्दारीचा ठपका पुसण्यासाठी मुख्यमंत्री जरांगेंचे लाड पुरवू लागले आहेत, अशी सणसणीत टीका नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीये. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.


मनोज जरांगे सारख्या माणसाला समोर केलं. मुख्यमंत्र्यांनी लाड पुरवल्यानेच त्यांच्या मागण्या वाढत गेल्या असल्याचं सांगत ओबीसी आरक्षण आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधलाय. ज्यांचे जास्त मुख्यमंत्री झाले, आमदार खासदार जास्त आहेत तोच समाज आज आरक्षण मागत आहे, ते देखील ओबीसींमधून! या राज्यात दहशत माजवली जात आहे. लोकांची घरे जाळली जात आहेत. आम्ही मराठा समाजाचा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही पण तुम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण का हवे आहे असा सवाल त्यांनी केला. 


शरद पवारांवर हल्लाबोल 


ओबीसी आरक्षण नेते नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीये. येणाऱ्या काळात सर्वच पक्षातील नेत्यांना आपल्या आरक्षणाबाबत विचारलं पाहिजे असं ते म्हणाले. त्यावेळी शरद पवारांनी मंडल आयोग लागू केले, आजचे शरद पवार भांडण पाहण्याचं काम करतात. असं ते म्हणाले.


हेही वाचा:


ओबीसी आरक्षणात मराठ्यांचा समावेश होणे शक्य नाही, मनोज जरांगेच्या सगे सोयरेच्या मागणीलाही माझा विरोध : प्रकाश आंबेडकर