Chhatrapati sambhajinagar: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची राजकीय जुगलबंदी सुरू असल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आमदार निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीत घेतली आणि शेवटी रामकृष्णहरी म्हणाले..बरे झाले वाजवा तुतारी नाही म्हणाले असं म्हणत खासदार कल्याण काळे यांनी निलेश लंकेंना मिश्किल टोला लगावला.


दुसरीकडे मी लुकडा-सुकडा पैलवान असं म्हणत कल्याण काळे यांनी उमेदवारी घेतली नसती तर ती माळ माझ्या गळ्यात पडली असती असं आमदार निलेश लंके म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील प्रमुख पक्षांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रोज आढावा बैठकांसह चर्चासत्रे भरवली जात आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा महत्त्वाचा मानला जात असून आज जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांसह काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.


अखेर कल्याण काळेंनी घेतले पत्नीचे नाव


दरम्यान खासदार कल्याण काळे यांना भाषण सुरू होण्यापूर्वी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे नाव घेत असताना शरद पवारांनी त्यांच्या पत्नीचे नाव घेण्यास त्यांना सांगितले. सर्वांची नावे घेतल्यानंतर अखेर कल्याण काळे यांनी त्यांची पत्नी रेखा काळे यांचेही नाव घेतले. जालना जिल्ह्याचा इंडेक्स बघितला तर शेवटचा नंबर लागतो असं म्हणत देशाचा संविधान वाचवण्याचं काम शरद पवार यांनी केलाच कल्याण काळे म्हणाले. 


बरं झालं तुतारी वाजवा म्हणाले नाहीत


आमदार निलेश लंके यांच्यावर बोलताना खासदार कल्याण काळे म्हणाले,निलेश लंके यांनी शपथ इंग्रजीत घेतली आणि शेवटी रामकृष्ण हरी म्हणाले...बरे झाले वाजवा तुतारी म्हणाले नाहीत असा मिश्किल टोला लगावल्याने सभागृहात हशा पिकला होता. 


दुधाच्या दरासंदर्भात शरद पवारांनी बाजू घ्यावी


राज्यात दूध जरा संदर्भात प्रश्न सातत्याने पुढे येत असून त्यावर कल्याण काळे म्हणाले, शरद पवारांनी दुधाच्या दरासंदर्भात बाजू घ्यावी. तसेच मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलन सुरू केले आहे त्याबाबत पवारांनी भूमिका घेतली पाहिजे.


आंब्याच्या आडीतला एकच आंबा खराब असतो


अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांसोबत येण्यास उत्सुक असल्याच्या राजकीय चर्चा आहेत. त्यापैकी बाबाजानी दुर्रानी हे आता परत आले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवार म्हणाले की, पक्षप्रवेश होताना कोणीतरी म्हटलं की सर्वांना पुन्हा घेऊ नका. पण मला माहीत आहे की आंब्याच्या आडीतला एकच आंबा खराब असतो, तो इतर सर्व आंबे खराब करतो. त्यामुळे आडी खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईल. 


अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पक्षात घेणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, अनेकांना वाटत आहे रस्ता चुकला आहे, त्यामुळे परत यावं असे वाटत असेल. काही लोकांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याबद्दल सरसकट निर्णय घेण्याची मानसिकता आमची नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबाबत विचार करणे सुरू आहे. 


हेही वाचा:


Sharad Pawar : एका खराब आंब्यामुळे संपूर्ण आडी खराब होणार नाही याची खबरदारी घेईन; परत येण्याची इच्छा असलेल्या आमदारांवर शरद पवारांची प्रतिक्रिया