मुंबई :  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे  शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी दाखल झाले आहेत. मात्र, छगन भुजबळ यांना शरद पवारांकडून भेट देण्यात आलेली नाही.  छगन भुजबळ एक तासापासून वेटिंगवर असल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांनी दोन दिवसांपासून भेटी गाठी आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले होते. मात्र,  आज छगन भुजबळ थेट शरद पवार यांची वेळ न घेत सिल्वर ओकवर दाखल झाले. अद्याप छगन भुजबळ वेटिंगवर  असल्याचं समोर आलं आहे. 


छगन भुजबळ वेटिंगवर  


शरद पवार यांच्याकडून आज केवळ दोन व्यक्तींना भेटीसाठी वेळ देण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. यापैकी एक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मिलिंद नार्वेकर त्यांना सिल्वर ओक मधून बाहेर पडल्याची माहिती आहे. 


भेट घेतल्यानंतर बाहेर पडणार, छगन भुजबळ यांचा पवित्रा 


छगन भुजबळ मागील अर्ध्या तासापासून शरद पवार यांची वाट पाहत बसले आहेत. शरद पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना वेळ देण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर शरद पवारांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर देखील छगन भुजबळ यांना भेट दिलेली नाही. शरद पवार यांची वेळ न घेताच छगन भुजबळ वेळ न घेताच भेटायला पोहचले आहेत. कुणालाही कुठल्याच प्रकारची कल्पना नसताना छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाल्यानं गोंधळ निर्माण झाला. 


शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडणार असा पवित्रा छगन भुजबळ यांनी घेतल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. छगन भुजबळ यांना शरद पवार यांच्याकडून भेटीसाठी वेळ देण्यात येतो का ते पाहावं लागेल.  भुजबळ अद्याप शरद पवार यांची वाट पाहत बसले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 


छगन भुजबळ यांनी काल बारामतीत आरक्षणाच्या मुद्यावरुन शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेनंतर छगन भुजबळांवर टीकेची झोड सुरु झाली होती. त्यानंतर आज भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं राजकीय क्षेत्रात तर्क वितर्क सुरु आहेत.


पाहा व्हिडीओ :




 
संबंधित बातम्या :


Chhagan Bhujbal : कटुता संपवण्याचं पहिलं पाऊल.., छगन भुजबळ शरद पवार भेटीबद्दल राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?


Chhagan Bhujbal Meets Sharad Pawar : छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी!