जालना : जालना (Jalna News)  इथे सुरू असलेल्या ओबीसी उपोषणकर्त्यांना (OBC Reservsation)  आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे.  सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar Airport)  दाखल झाले असून शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला वडीगोद्रीकडे रवाना झाले आहे.विमानतळावर दाखल होताचा सर्व मंत्र्यांची  चर्चा झाली.  दरम्यान एअरपोर्टवर झालेल्या मीटिंगमध्ये हाके यांना ओबीसीला धक्का लागणार नाही हे लेखी द्यायचं का यावर चर्चा झाली. तसेच मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange)  टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. कावळ्याच्या शापाने गाई मरतात का? असा पलटवार भुजबळांनी केला आहे.


छगन भुजबळ म्हणासे,  सर्वपक्षीय लोकांनाा बोलवून निर्णय घेण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन हाके यांच्याकडे जाणार आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमरे यांची प्रकृती ढासाळत आहे.उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहे. आत्मक्लेष न करता उपोषण सोडावे, अशी विनंती करणार आहे. 


कारकीर्द संपवणार,  मनोज जरांगेंच्या टीकेवर भुजबळ म्हणाले...


मराठ्यांचं नुकसान केलं तर छगन भुजबळांची कारकीर्द संपवेल  असा इशारा मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना दिला. यावर छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे.  मनोज जरांगेंच्या टीकेवर भुजबळ म्हणाले, माझे राजकीय करिअर कोणीही उद्ध्वस्त करु शकत नाही. माझे करिअर उद्ध्व्स्त करणे  हे जनता जनार्धनांच्या हाती आहे. कोणा एका व्यक्तीच्या हाती ते नाही. बाकी कोण आहेत हे? कावळाच्या शापाने गाय मारते का? 


 कोण कोण जाणार लक्ष्मण हाकेंच्या भेटीला?  



  • मंत्री छगन भुजबळ 

  • मंत्री उदय सामंत 

  • मंत्री गिरीश महाजन 

  • मंत्री अतुल सावे 

  • मंत्री धनंजय मुंडे 

  • गोपीचंद पडळकर 

  • समीर भुजबळ 

  • प्रकाश शेंडगे 

  • शब्बीर अन्सारी 

  • संतोष गायकवाड 

  • प्रशांत जोशी 

  • अजय पाटणे


वाघमारे उपोषण मागे घेणार का?


  सरकारच्या शिष्टमंडळात सहा वरिष्ठ मंत्र्यांसह आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा समावेश आहे. शिष्टमंडळ आधी वडीगोद्री इथे जाऊन आंदोलकांशी चर्चा करेल. त्यानंतर शिष्टमंडळ पुण्यात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंगेश ससाणेंची भेट घेईल. मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आज आंदोलनाच्या 10 व्या दिवशी हाके आणि वाघमारे उपोषण मागे घेतात का याची उत्सुकता आहे.


Video:



हे ही वाचा :


सरकारी शिष्टमंडळाचं विमान संभाजीनगरमध्ये लँड, भुजबळ-मुंडेंसह 12 जणांची टीम लक्ष्मण हाकेंची मनधरणी करणार