Chhagan Bhujbal on Raj Thackeray : तुम्ही छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मांडीला मांडी लावून कसे बसलात? असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्या टीकेनंतर मंत्री छगन भुजबळांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान छगन भुजबळ आणि राज ठाकरे सध्या महायुतीत असले तरी दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. 


काय म्हणाले छगन भुजबळ? 


छगन भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तसा प्रश्न राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना देखील विचारला पाहिजे. एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे म्हणतात, मग छगन भुजबळ आता तुमच्या मांडीला मांडी लावून का बसतोय? राज ठाकरेंनी हे विचारलं पाहिजे. 


तुम्ही इकडं पण असता तिकडं पण असता


पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, माझ्याबद्दल ही सगळी मंडळी बोलतात. मी शिवसैनिक असेल. फार कट्टर नव्हतो असं समजूयात. अरे तुम्ही रक्ताचे होतात. मला आठवतं की, राज आला नाही, राज आला नाही. तोपर्यंत ते जेवायचे नाहीत. शाळेतून अजून कसा आला? असं मातोश्रीवर विचारलं जायचं. तुम्ही असं काय केलंत? तुम्ही इकडं पण असता तिकडं पण असता, असा टोलाही भुजबळांनी ठाकरेंना लगावला. 


काय म्हणाले होते राज ठाकरे?


शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून शिवसेना फोडायला सांगितली. त्यावेळा शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं ते आज इथे असतील. माझा काय आपला बाहेरुन पाठिंबा मी काहीही बोलू शकतो. त्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने बाळासाहेबांची शिवसेना फोडली. आजचे नेतृत्व तेव्हा टाहो फोडताना दिसत नव्हती. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्यासाठी प्रयत्न केला होता, त्यांच्या मांडिला मांडी लावून तुम्ही बसता, असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला होता. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्याकडून सातत्याने महायुतीतील नेत्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिले जात आहेत. शिवाय महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचे विधानही भुजबळांनी केलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Solapur Loksabha : सांगलीत युनीकॉर्न, सोलापुरात थेट 1 लाख रुपयांची पैज, प्रणिती शिंदे की राम सातपुते, कोण बाजी मारणार, राष्ट्रवादी-मनसे कार्यकर्त्यांची शर्यत!