एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal oath taking ceremony: छगन भुजबळांना मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी फक्त एका ओळीचा मेसेज आला, पडद्यामागे नक्की काय घडलं?

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार, सकाळी 10 वाजताचा मुहूर्त; धनंजय मुंडेंकडील खातं भुजबळांना मिळणार. महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.

Chhagan Bhujbal Maharashtra Cabinet: महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण कोळून प्यायलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा एकदा अनपेक्षितपणे प्रकाशझोतात आले आहेत. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. तेव्हापासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून काहीसे अंतर आणि अबोला राखून होते.

दरम्यानच्या काळात राज्य आणि देशपातळीवरील अनेक घडामोडींमुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रि‍पदाचा विषयही राजकीय वर्तुळाच्या विस्मरणात गेला होता. खुद्द छगन भुजबळ यांनीच मंत्रि‍पद न मिळाल्याबाबत अधुनमधून नाराजी व्यक्त करण्यापलीकडे ठोस काहीतरी घडेल, ही आशा सोडून दिली होती. मात्र, सोमवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, हे निश्चित झाले. छगन भुजबळ हे मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतील,  असे सांगितले जात आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपवला जाईल, अशी दाट शक्यता आहे. (Maharashtra State Cabinet)

छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची माहिती समोर आल्यानंतर पडद्यामागे नेमक्या काय घडले, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून किंवा छगन भुजबळ यांच्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिपदाविषयी कोणतेही संकेत देण्यात आले नव्हते. खुद्द छगन भुजबळ यांनी आपल्याला केवळ एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले. मला एवढंच सांगण्यात आलं की, राज्य मंत्रिमंडळात माझी वर्णी लागत आहे. मंत्रि‍पदाचा शपथविधी मंगळवारी सकाळी दहा वाजता होईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आता थोड्याचेळात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे राजभवनातील सोहळ्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देतील.

छगन भुजबळ हे सध्या 77 वर्षांचे आहेत. ते महाराष्ट्राच्या गेल्या चार-पाच दशकांच्या राजकारणातील घडामोडींचे साक्षीदार आणि भागीदार राहिले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात महायुती सरकारचा शपथविधी संपन्न झाला तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी बेधडकपणे राष्ट्रावादी काँग्रेसचे नेतृत्त्व करणाऱ्या अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना सुनावायला मागेपुढे पाहिले नव्हते. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वानेही छगन भुजबळ इतकी थेटपणे टीका करत असताना सबुरी आणि नरमाईचे धोरण अवलंबिले होते. या सगळ्यामागे ओबीसी मतपेढीचे गणित असल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला दूर ठेवल्याने मोठा राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळेच अजित पवार आणि महायुती सरकारची सूत्रे हलवणाऱ्या नेत्यांनी योग्यवेळी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याची चर्चा आता रंगली आहे.

आणखी वाचा

नाराजी दूर झाली, महायुतीच्या मंत्रिमंडळात दमदार एन्ट्री; नगरसेवक ते मंत्री, कशी आहे भुजबळांची कारकीर्द?

छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी, आज घेणार शपथ; नव्या ट्विस्टमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा आणखी वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Embed widget