Chhagan Bhujbal, मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ यांना दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळ आज (दि.26) पुण्यात होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुणे येथे दौऱ्यावर होते. ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने आज त्यांना अधिक त्रास जाणवल्याने दुपारी पुणे येथून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 


छगन भुजबळ यांना रुग्णालयात केले दाखल


तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केलं दाखल 


छगन भुजबळ याना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने केलं दाखल 

पुण्याहून विशेष विमानाने पुण्याहून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केले दाखल


छगन भुजबळ यांना यापूर्वी 2022 मध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्येही अस्वस्थ वाटू लागल्याने रग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही ते मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी अॅडमिट झाले होते. छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यावेळी उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. 


छगन भुजबळांनी दोन दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांसोबत साजरी केली होती ईद 


छगन भुजबळांनी दोन दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांसोबत ई-ए-मिलाद हा सण साजरा केला होता. मुस्लिम बांधवांचा आनंदाचा उत्सव ईद-ए-मिलादच्या निमीत्ताने आपल्या येवला शहरात सहारा सोशल फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन छगन भुजबळ यांनी केले होते. तसेच शिबिरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या


मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न