Manoj Jarange: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापताना दिसतोय. लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अहमदपूरच्या ज्ञानोबा तिडोळे आणि पत्नी चंचला तिडोळे या दोघांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून बीड मधील मराठा आरक्षणासाठी जीव संपवल्याची सुसाईड नोट देत आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना मराठवाड्यात आणखी एक असाच प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


नक्की प्रकरण काय? 


मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहा वेळा उपोषण केलंय. मात्र उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. तसेच मराठा आरक्षण दिले नाही. याच्या निराशेतून या पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अहमदपूर मधील राहणाऱ्या या जोडप्यानं मराठा आरक्षणासाठी विष पीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. 


दरम्यान, वेळीच त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचा सांगण्यात येत आहे. 
मराठवाड्यात यापूर्वीही बार्शीतल्या तरुणाचं सुसाईड नोट देऊन मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची घटना घडली होती. आता लातूरच्या अहमदपूरमधील जोडप्यानं विष पीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


मराठा आरक्षणाचं उपोषण स्थगित


मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण थांबवलं आहे. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी अंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती. त्यानंतर आत मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं. अंतरवालीमध्ये जमलेल्या महिला आणि बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन जरांगेंनी हे आंदोलन स्थगित केलं. मनोज जरांगे यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. 


मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे त्यांच्या अंतरवाली सराटीत आंदोलनासाठी बसले होते. पण या काळात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने कोणतंही पाऊल उचललं नसल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंच्या विरोधात आंदोलन सुरू केलं.


हेही वाचा:


Manoj Jarange VIDEO : मनोज जरांगे नवव्या दिवशी 'थांबले', उपोषण स्थगित करण्याचा निर्णय; पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, सरकारला इशारा