Chandrashekhar Bawankule on Ramdas Athawale, पुणे : भाजप नेते आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची माफी मागितली आहे. "मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चुक झाली आहे", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगले स्थान देईल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रीपदावरुन कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजूत काढतील. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे हे त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाहीमुळे मिळालेले नाही, असंही बावनकुळे यांनी नमूद केलं.
मंत्रिपदाची शपथ घेणारे मंत्री-
कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखेपाटील
3. हसन मुश्रीफ
4. चंद्रकांत पाटील
5. गिरीश महाजन
6. गुलाबराव पाटील
7. गणेश नाईक
8. दादा भुसे
9. संजय राठोड
10. धनंजय मुंडे
11. मंगलप्रभात लोढा
12. उदय सामंत
13. जयकुमार रावळ
14. पंकजा मुंडे
15. अतुल सावे
16. अशोक उईके
17. शंभूराज देसाई
18. आशिष शेलार
19. दत्ता भरणे
20. आदिती तटकरे
21. शिवेंद्रसिंह भोसले
22. माणिकराव कोकाटे
23. जयकुमार गोरे
24. नरहरी झिरवळ
25. संजय सावकारे
26. संजय शिरसाठ
27. प्रताप सरनाईक
28. भरत गोगावले
29. मकरंद पाटील
30. नितेश राणे
31. आकाश फुंडकर
32. बाबासाहेब पाटील
33. प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री
1. माधुरी मिसाळ
2. आशिष जयस्वाल
3. पंकज भोयर
4. मेघना बोर्डीकर साकोरे
5. इंद्रनील नाईक
6. योगेश कदम
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी- (Shivsena Cabinet Minister List)
1. उदय सांमत- कॅबिनेट मंत्री
2. प्रताप सरनाईक- कॅबिनेट मंत्री
3. शंभूराज देसाई- कॅबिनेट मंत्री
4. भरत गोगावले- कॅबिनेट मंत्री
5. दादा भूसे- कॅबिनेट मंत्री
6. प्रकाश आबिटकर- कॅबिनेट मंत्री
7. गुलाबराव पाटील- कॅबिनेट मंत्री
8. संजय राठोड- कॅबिनेट मंत्री
9. संजय शिरसाट - कॅबिनेट मंत्री
10. योगश कदम- राज्यमंत्री
11. आशिष जयस्वाल- राज्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचा रविवारी (दि.15) शपथविधी पार पडला. यावेळी एकूण 33 मंत्र्यांनी शपथ घेतली. 33 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, तर 6 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
इतर महत्त्वाच्या बातम्या