अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एक दिवस नवनीत राणा या आदेश देतील आणि रवी राणा (Ravi Rana) हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करतील असा विश्वास असल्याचं बावनकुळे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत.


रवी राणादेखील भाजपमध्ये येतील 


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी 2023 मध्ये जन्माष्टमीच्या दिवशी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की यावेळी अमरावतीत कमळ चिन्हावर उमेदवार उभा असेल. आता रवी राणा युवा स्वाभिमान पक्षात आहेत. पण माझा अंबादेवीवर विश्वास आहे, नवनीत राणा एके दिवशी आदेश देतील आणि रवी राणा पण भाजपमध्ये येतील. ही जागा शिवसेनेकडे असूनही मुख्यमंत्र्यांनी मोठं मन करून ही जागा भाजपला दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. आता जबाबदारी सुपर वाँरियरर्सवर आहे. यंदा दोन ते तीन लाख मतांनी नवनीत राणा निवडून येतील आणि आमचा संकल्प आहे की 51 टक्के मतदान हे भाजपला होईल.


ही निवडणूक पंतप्रधानपदासाठी


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ही निवडणूक नवनीत राणाची नाही, बावनकुळेंची नाही तर ही निवडणूक पंतप्रधानपदासाठी आणि विकसित भारतासाठी आहे.  भाजप संविधान बदलणार असं खोटं विरोधी पक्षाकडून सांगितलं जातंय. मोदीजी यांनी कधीही संविधान बदललं नाही. काँग्रेसने मात्र अनेकवेळा संविधान बदललं. मुस्लिम लोकांना सांगिंतलं जातंय की ये आएंगे तो ये तुमको हकाल देंगे. पण मोदींजींनी त्यांना स्वरक्षण दिलं. 


उद्धव ठाकरे लाचार माणूस


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हुकूमशाही सरकार होतं. आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते तेव्हा या नवनीत राणा आणि रवी राणानी काही विचार न करता भाजपसाठी काम केलं असं बावनकुळे म्हणाले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंसारखा लाचार माणूस मी कधी पाहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली असती तर काय झालं असतं? उद्धव ठाकरे यांनी एका महिलेला 14 दिवस जेलमध्ये टाकले. याकूब मेमनच्या कबरीचा सुशोभीकरण करणारा हा उद्धव ठाकरे. त्यामुळे 26 एप्रिलची निवडणूक ही आपल्यासाठी महत्वाची आहे. यंदा अमरावतीत महायुतीचा खासदार राहिलाच पाहीजे.


अमरावतीत 'कमळ खिलेगा' याचा अर्थ आज समजला


भाजपच्या उमेदवारी नवनीत राणा म्हणाल्या की, भाजप माझा परिवार आहे. मी अपक्ष असली तरी सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी मागील पाच वर्षांपासून करत आहे. आज भाजपचा चेहरा तुम्ही लक्षात नाही ठेवला तरी कमळ या चिन्हाकडे पाहून आपण काम केलं पाहिजे.'कमल खिलना चाहीये' हे लक्षात ठेवलं पाहीजे. तुमच्या योगदानापेक्षा माझं योगदान पक्षात शून्य आहे. मी आताच पक्षात आली आहे. अमरावती मध्ये 'कमल खिलेगा' हे अनेक भाजपचे नेते म्हणत होते, आज ते समजलं. कमळ हे चिन्ह अमरावतीमध्ये निवडणुकीच्या मशिनवर आलं. अबकी पार 400 पार होणारच.


ही बातमी वाचा: