Chandrashekhar Bawankule नागपूर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्या उंची कायम ठेवून आरोप लावले पाहिजे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या बद्दल वैयक्तिक आरोप करून महाजनांच्या जीवनाबद्दल संशय निर्माण करणे योग्य नाही. या पद्धतीचे राजकारण खडसेंनी सोडलं पाहिजे. गिरीश महाजन अत्यंत निष्कलंक नेते आहे. असे बोलून खडसेंनी आपली पत कमी करू नये. अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.

Continues below advertisement


कोणीही कोणासोबत उभे राहून फोटो काढतो आणि त्या व्यक्तीने पुढे काही घटना केली, काही गुन्हा केला, तर त्यासाठी नेता कसा दोषी होऊ शकतो? लोढाचे विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत, आमदारांसोबत फोटो आहेत. फोटो पाहून संबंध जोडणे योग्य नाही. तुमच्यात धमक असेल तर तुमच्याकडे असलेल्या सीडी दाखवत का नाही? मीडियावर ती दाखवावी आणि मीडियाने सुद्धा विकासासंदर्भात बोलावं, सकाळी 9 वाजताच्या पत्रकार परिषदेवर दिवसभर प्रश्न विचारू नये. असेही ते म्हणाले.


एकनाथ खडसे यांच्याकडून एसआयटी चौकशीची मागणी


राज्याचे जलसंपदा मंत्री, भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे.  अशातच एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हनीट्रॅपचे प्रकार घडायला लागलेले आहेत, असं म्हटलं.  नुकतंच नाशिकचं एक प्रकरण आलं होतं, ज्याच्यात 72 अधिकारी आणि काही लोकं अडकल्याचं, त्याची चौकशी सुरु आहे. दुसरं उदाहरण आता समोर आलं आहे, प्रफुल्ल लोढा म्हणून आमच्या जळगावातील जामनेरचा आहे. भाजपचा कार्यकर्ता आहे, गिरीश महाजनचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर देखील एक गुन्हा दाखल झाला आहे.


प्रफुल्ल लोढानं गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली असं एकनाथ खडसे म्हणाले. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकणार नाहीत, यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणावर भाष्य करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसे यांना थेट आव्हान देत गिरीश महाजन यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.


मी त्यावर काही बोलणे योग्य ठरणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे


दरम्यान, कृषिमंत्री कोकाटे यांनी स्वतः भूमिका व्यक्त केली आहे. मुळ्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चौकशीनंतर सर्व समोर येईल, असे मत व्यक्त केले होते. आता कोकाटे स्वतः त्या संदर्भात बोलले आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणे योग्य ठरणार नाही. असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.


हेदेखील वाचा