Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Maharashtra) यांची आज महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात (Chandrapur) होत आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या (Sudhir Mungantiwar) प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात (Modi in Chandrapur) येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून पंतप्रधान मोदी या सभेच्या निमित्याने ते महाराष्ट्रात आपल्या प्रचाराचा नारळ आज फोडणार आहे. मात्र, अशा कितीही सभा घेतल्या तरी मोदीजींच्या प्रचाराने इथल्या जनतेच्या मनावर त्याचा काहीही फरक पडणार नाही. मतदारसंघातील जनता सूज्ञ आणि सुजाण आहे. ते आपल्या भविष्यासाठी योग्य तो निर्णय घेईल. त्यामुळे आमच्या दृष्टीने इथे कुठलीही टफ फाईट नाही. असा विश्वास काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी बोलताना व्यक्त केलाय.


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यापासून प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगतान दिसत आहे. सोबतच  2019 मध्ये याच मतदारसंघात काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी राज्यात एकमेव दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. त्यामुळे अबकी बार चारसो पारचा नारा देणाऱ्या भाजपला या मतदारसंघातून विजय संपादन करणे फार महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्रातील प्रचारचे रणशिंग आज चंद्रपूरातून फुंकणार आहे.


चंद्रपुरातील जनता ही सुज्ञ आहे


मात्र, असे असले तरी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदारांवर पूर्ण विश्वास दर्शवला असून अशा कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम निवडणुकांवर होणार नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी उमेदवार असल्याने पंतप्रधानांचे याठिकाणी प्रचाराला येणे हे स्वाभाविक आहे. मात्र चंद्रपुरातील जनता ही सुज्ञ आहे. आपल्यासाठी योग्य काय किंवा अयोग्य काय, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे आपण कोणाला निवडून द्यावे हे त्यांना चांगल्याने ठाऊक आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये अशा सभापेक्षा जनतेचा कौल कोणाच्या बाजूने हे महत्वाचे राहणार असल्याचेही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.


मोदींची लाट आता पूर्णपणे ओसरली- विजय वडेट्टीवार


संध्याघडीला भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आपल्या जीवाचं रान करताना दिसत आहे. असे असले तरी त्यांनी कितीही प्रयत्न आणि सभा घेतल्या तरी जनता त्यांना यावेळी स्वीकारणार नाही. अशा कितीही सभा घेतल्या तरी विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा होणार आहे. मोदींची लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. त्यांना ऐकायला लोक सभेत जातात, मात्र मतात त्याचं काहीही केल्या रूपांतर होत नाही. त्यामुळे केवळ सभा घेऊन निवडणूक जिंकता येत नसल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला.


इतर महत्वाच्या बातम्या