Chandrakant Patil : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांची ईडीकडून  (ED) चौकशी करण्यात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering) ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. त्यावर पत्रकारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना विचारले असता ते म्हणाले, विरोधकांना जर वाटत असेल की नवाब मलिकांवरील कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने आहे तर त्यांनी न्यायालयात जावं.  ईडीची नोटीस मिळालेले संजय राऊत, अजित पवारांचे काय होणार? हे ईडी ठरवेल. छगन भुजबळ, अनिल देशमुख यांचा जसा पुढे त्यांच्या नेत्यांना विसर पडला तसाच नवाब मलिकांचाही पडेल. 


जर पापाचा घडा भरला असेल तर हे सरकार कोसळणारच


मी कोणताही दावा करत नाही पण जर पापाचा घडा भरला असेल तर हे सरकार कोसळणारच. असे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी करत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 



नवाब मलिक ( Nawab Malik) यांची ईडीकडून  (ED) चौकशी


राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांची ईडीकडून  (ED) चौकशी करण्यात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering) ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.  याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे, ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी व घोषणाबाजी करण्यात येत आहे.


EDच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते दाखल


EDच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन करण्यात येत असून यावेळी कोणीही पदाधिकारी किंवा बडे नेते उपस्थित नव्हते. ईडीच्या कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतले असल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. नवाब मलिक यांची चौकशी ज्यासाठी ईडीनं सुरु केलीय ते प्रकरण दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीनं याआधीच ताब्यात घेतलं आहे. या चौकशीत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागली. नवाब मलिक यांच्या भावाला काल ईडीने समन्स पाठवल होत. त्यानंतर आज पहाटे नवाब मलिक यांच्या कुर्ला या निवासस्थानी ईडीचे अधिकारी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान पोहचले. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात स्वत: हून येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी अधिकाऱ्यांसोबत घरातून निघाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha