अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rane) जात प्रमाणपत्र (Caste Certificate) प्रकरणी निकाल येण्याआधीच अमरावतीसाठी भाजपचा (BJP) प्लॅन B तयार आहे. अमरावतीसाठी भाजपकडून नव्या उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. आचार संहिता लागण्यापूर्वीच खासदार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्राचा निकाल लागणार आहे. नवनीत राणा यांचा बनावट जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी निकाल लागल्यानंतर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवनीत राणांना दिलासा मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
1 एप्रिलला बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी निकाल
खासदार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. एक एप्रिलला निकाल लागल्यानंतर 2 एप्रिलला महायुतीकडून त्यांची उमेदवारी घोषित होणार अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर 4 एप्रिलला नवनीत राणा लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार अशीही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर आली आहे.
नवनीत राणांना दिलासा मिळणार?
आचार संहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्राचा निकाल लागणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी महत्त्वाचा निकाल काही दिवसात लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने 108 पानाचा जजमेंट दिला आहे. त्यामध्ये राणा यांचे सात ही जात प्रमाणपत्र खोटे ठरविले आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातू असून त्याचा निकाल 1 एप्रिलला लागणार आहे. आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
नवनीत राणाऐवजी 'या' उमेदवारांच्या नावाचा विचार सुरु
जर निकाल नवनीत राणा यांच्या विरोधात लागला तर भाजपाचा प्लान बी तयार असून अमरावती प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्या मूळच्या अकोला जिल्ह्याच्या आहे. तसेच दिगवंत रा.सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई आणि एक माजी आयएएस अधिकाऱ्याचे नावही विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे.
अमरावतीची जागा घटक पक्षाला
अमरावती लोकसभेची जागा घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या पुन्हा युवा स्वाभिमान पार्टी कडूनच 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. काही दिवसांपासून नवनीत राणा ह्या भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण अमरावतीची जागा ही घटक पक्ष असलेल्या राणा दाम्पत्य यांच्या युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात आली आहे..
नवनीत राणा यांच्यावर आरोप काय?
नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :