Buldhana: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घटनांना वेग आला आहे. कुठल्या विधानसभा मतदारसंघातून कशी रणनीती आखायची, कोणाला उमेदवारी द्यायची अशा असंख्य घटना राज्यात घडत असताना  स्वेच्छानुववृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. एक जुलैला स्वच्छ निवृत्ती घेतल्यानंतर आता राजकारणात येण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारलाय. विदर्भाच्या मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता कोणता नव राजकीय समीकरण विदर्भातून समोर येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक जुलैला मंत्रालयीन कारभारातून स्वेच्छा निवृत्ती घेत मंत्रालयाचे स्वेच्छानिवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीत दुपारी एक वाजता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. विदर्भात मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाला हे चॅलेंज असणार की नाही याची उत्सुकता आहे. सध्या मेहकर विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे संजय रायमूलकर आमदार आहेत.


सिद्धार्थ खरात कोण?


स्वच्छ निवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच ग्रामविकास गृह विभाग या विभागांमध्ये सहसचिव म्हणून काम केलं असून राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री व केंद्रीय राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे.


बुलढाण्यातील मेहकर जागा कोणाची?


बुलढाण्यातील मेहकर विधानसभेचे जागा गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसची आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून विधानसभेच्या मेहकर मतदार संघासाठी स्वेच्छानिवृत्त सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय रायमुलकर यांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत संजय रायमुलकर यांना 1 लाख 12 हजार 038 मते पडली होती.  तर दुसऱ्या क्रमांकावरील अनंत वानखेडे यांना 49 हजार 836 मते मिळाली होती.