Nitin Gadkari On Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांनी बुधवारी मोदी सरकारचा (modi government) अर्थसंकल्प सादर केला. यावेळी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 36 टक्के वाढ झाली आहे. एबीपी न्यूजच्या 'बजेट कॉन्क्लेव्ह'मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.


नितीन गडकरी म्हणाले की, यावेळी रस्ते वाहतूक मंत्रालयाला 2.70 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2024 च्या समाप्तीपूर्वी भारताची रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेसारखी असेल. दिल्लीहून डेहराडून, चंदीगड, जयपूरला जाणे इतके सोपे आणि सोयीचे केले जाईल की, लोक विमानाने प्रवास करण्याची गरज भासणार नाही. ते म्हणाले की, देशातील पायाभूत सुविधांमध्ये बदल करायचा असेल तर मागासलेल्या भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला आमचे प्राधान्य आहे.


Nitin Gadkari: "आपण जगाची सुपर इकॉनॉमी बनू"


नितीन गडकरी म्हणाले की, ''रस्त्यानेच विकास होतो. रस्ता चांगला झाल्यास परिसरात उद्योग येतील व रोजगार उपलब्ध होईल. रोजगार मिळाला तर गरिबी दूर होईल. अर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला गती मिळेल. आपण जगाची सुपर इकॉनॉमी बनू. आमची कुणाशी स्पर्धा नाही. आम्ही फक्त आमचे काम करत आहोत.''


Nitin Gadkari: विरोधकांच्या निवडणूक बजेटच्या आरोपांना दिले उत्तर 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी याला निवडणुकीचा अर्थसंकल्प म्हटले आहे, त्यावर नितीन गडकरी म्हणाले की, जे समजूनही समजले नाही म्हणत आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचे. अर्थसंकल्प चांगला आहे असे विरोधकांनी सांगितले, तर प्रसारमाध्यमे विरोधकांच्या मागे लागतात. टीका करणे हे त्याचे काम आहे. अर्थसंकल्पावर विरोधक नक्कीच प्रश्न उपस्थित करतील.


Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आव्हानावर काय म्हणाले?


भाजपच्या कोणत्याही नेत्याने जम्मू-काश्मीरमध्ये फिरून दाखवावे, असे आव्हान राहुल गांधींनी दिले होते. त्यावर ते म्हणाले की, मी जम्मू-काश्मीरमध्ये 1 लाख कोटींचे काम करत आहे. मी तिथे रस्ते आणि बोगदे बांधत आहे, जे काँग्रेसच्या काळात कधीच झाले नाहीत. जे आम्ही 9 वर्षात केले ते 60 वर्षात करू शकले नाही. नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही सातत्याने जनतेच्या हिताचे निर्णय घेत असतो. आम्ही मेडिकल कॉलेज, एम्स उघडत आहोत. आपण हरित ऊर्जेकडे जात आहोत. 2030 पर्यंत भारत उत्पादन क्षेत्रात प्रथम क्रमांकावर येईल.