Mumbai University : महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक  शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केला आहे. मुंबई विद्यापीठाची निवडणूक मागील अडीच वर्ष रखडली असताना  दोन वेळेस पुढे ढकलण्यात आली होती. जेव्हा विद्यापीठाने 22 सप्टेंबरला ही निवडणूक घ्यायचं ठरवलं तेव्हा पुन्हा एकदा ही निवडणूक आता पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. परिपत्रकात नेमकी स्थगितीचे कारण देण्यात आलेलं नाही. दरम्यान, निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संताप व्यक्त केलाय. 


मुख्यमंत्र्याच्या दबावामुळे निवडणूकीचा बळी - अभाविप


मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्य निवडणूकीचे मतदान येत्या रविवारी, दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित होते. शेवटच्या घटकेला विद्यापीठ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडून निवडणूक प्रक्रिया अस्थायी कालावधीसाठी स्थगित करणे हा लोकशाहीचा बळी आहे. सुरळीत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या विद्यापीठाचा हा निर्णय पदवीधरांसाठी अपमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिली आहे. 


मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकला


यावेळी अभाविप कोकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वारंवार दुर्लक्षित करत असतानाच स्वतःच्या राजकीय लोभपायी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकत मागील दोन वर्षांपासून प्रलंबित मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या विषयात अभाविपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार आहे.


शेवटच्या घटकेला विद्यापीठ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडून निवडणूक प्रक्रिया अस्थायी कालावधीसाठी स्थगित करणे हा लोकशाहीचा बळी आहे. सुरळीत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या विद्यापीठाचा हा निर्णय पदवीधरांसाठी अपमानास्पद आहे’, असे मत अभाविप कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी व्यक्त केले आहे.


असे घाबरट गद्दार मिंधे मुख्यमंत्री आणि अकार्यक्षम शिक्षणमंत्री असले की तरुणांच्या ताकदीला असेच घाबरतात! 22 तारखेला होणारी सिनेट निवडणुक 'सरकारच्या आदेशावरुन रद्द केली'...डरते रहो, यह डर अच्छा हैं! लेकिन हम अपने लोकतंत्र के लिए लड़ेंगे और जीतेंगे!, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचं ठरलं, जागा वाटपाचा फॉर्म्युला 'एबीपी माझा'च्या हाती