Bombay High Court, मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिलाय. मोहन चव्हाण नामक इसमाला अर्थहीन याचिका मागे घेण्याची मुभा देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून शिक्षा देण्यात आली आहे. येत्या तीन आठवड्यांत जातीनं ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन दंडाची रक्कम अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ठाकरेंनी आपल्या मस्तकी न लावता मागे उभ्या इसमाकडे दिला होता
काही दिवसांपूर्वी बंजारा समाजाच्या एका मंहतांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना प्रसाद आणि अंगारा दिला होता. त्यातला अंगारा ठाकरेंनी आपल्या मस्तकी न लावता मागे उभ्या इसमाकडे दिला होता. ठाकरेंच्या या कृतीमुळे आपल्या समाजाच्या महंतांचा अपमान केल्याबद्दल ठाकरेंविरोधात कारवाईची मागणी करत मोहन चव्हाण यांनी हायकोर्टात दाखल याचिका केली होती. या याचिकेवर नुकतीच औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांच्यापुढे सुनावणी झाली.
उगाचच एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हायकोर्टानं याचिकाकर्त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली
तेव्हा अशी बिनबुडाची याचिका दाखल करून उगाचच एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हायकोर्टानं याचिकाकर्त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. अशाप्रकारे तथ्यहीन याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ फुटक घालवल्याबद्दल हायकोर्टानं चव्हाण यांनी ही अनोखी शिक्षा सुनावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या