मुंबई : आमदार नवाब मलिक (Nawab Malik)  यांच्यावरून भाजप (BJP)  आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा वाद झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मलिकांना पक्षात घेऊ नका या आशयाचं जाहीर पत्र अजित पवारांना लिहिलं होतं. तेव्हापासून मलिक हा दोन्ही घटकपक्षांमधील मतभेदाचाच मुद्दा राहिला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दादांना मलिक यांना उमेदवारी द्यायची होती असं कळतं. पण मलिक यांच्यावरच्या दाऊद कनेक्शनच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं त्यावर तीव्र आक्षेप घेतला. नबाव मलिक यांचे काम भाजप करणार नाहीत, असे भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले.  ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 


आशिष शेलार म्हणाले,  दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजप कार्यकर्ते करणाार नाहीत. आमची भूमिका ठाम आहे. 


या सर्व पार्श्वभूमीवर तोडगा म्हणूनच आता मलिकांच्या कन्या सना मलिक यांना अजितदादांनी पूर्व मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. आज सकाळी त्या एबी फॉर्मही घेऊन गेल्या. सना यांच्यावर कुठलाही आरोप विरोधकांना करता येणार नाही, असा तर्क अजितदादांनी मांडला असावा. पण भाजप त्यावर अजूनही पूर्णपणे समाधानी आहे असं वाटत नाही. 


नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांना मानाचं पान का?


नवाब मलिकांना भाजपचा आक्षेप आहे आणि विरोधकही टीकेचे बाण सोडतायत. या पार्श्वभूमीवर दादांनी नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांना मानाचं पान दिलंय. विधानसभेच्या निवडणुका हाकेच्या अंतरावर आहेत.  नवाब मलिक ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतात तिथं मुस्लिम मत ही निर्णायक आहेत. त्यामुळे त्यांना अडगळीत टाकणं हे अजितदादांना आणि पर्यायानं महायुतीला देखील परवडणारं नाही असं राजकीय विश्लेषक म्हणतात. याच बेरजेच्या राजकारणात नवाब मलिकांना जवळ करण्याचं गणित दडल्याची चर्चा आहे. 


भाजपचा मलिकांना विरोध का?


भाजपने नवाब मलिकांवर देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत.  मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक तुरुंगात होते. आता ते जामीनावर बाहेर आहेत.   मलिकांच्या उपस्थितीवर भाजपचा आक्षेप आहे. 


हे ही वाचा :


आधी पक्षप्रवेश, नंतर थेट एबी फॉर्मचे वाटप, सना आणि निशिकांत पाटलांना एबी फॉर्म, नवाब मलिकांचं काय?