Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेस (Congress 2nd candidate list) पक्षाने आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 80 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. 


काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर


भुसावळ - राजेश मानवतकर
जळगाव - स्वाती वाकेकर
अकोट - महेश गणगणे
वर्धा - शेखऱ शेंडे
सावनेर - अनुजा केदार
नागपूर दक्षिण - गिरिश पांडव
कामठी - सुरेश भोयर
भंडारा - पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड
आमगाव - राजकुमार पुरम
राळेगाव - वसंत पुरके
यवतमाळ - अनिल मांगुलकर
आर्णी - जितेंद्र मोघे
उमरखेड - साहेबराव कांबळे
जालना - कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप - यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील


दरम्यान, आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 196 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवस बाकी असताना अजूनही 92 जागांवर उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. 


आतापर्यंत महाविकास आघाडीतील पक्षांनी जाहीर केले उमेदवार


 शिवसेना ठाकरे गट - 80 
 काँग्रेस पक्ष  - 71 
 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 45


उद्धव ठाकरेंकडून 80 जागांवर उमेदवार निश्चित 


दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024)15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये धुळे शहरातून अनिल गोटे आणि चोपडा येथून राजू तडवी यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय जळगाव शहरातून जयश्री सुनील महाजन, बुलढाणामधून जयश्री शेळके, दिग्रसमधून पवन श्यामलाल जैस्वाल, हिंगोलीतून रुपाली राजेश पाटील आणि परतूरमधून आसाराम बोराडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. देवळाली (अनुसूचित जाती) येथील योगेश घोलप, कल्याण पश्चिमेतून सचिन बासरे, कल्याण पूर्वेतून धनंजय बोडारे, वडाळ्यातून श्रद्धा श्रीधर जाधव, शिवडीतून अजय चौधरी, भायखळा येथून मनोज जामसुतकर, श्रीगोंदा येथून अनुराधा राजेंद्र नागवडे आणि संदेश भास्कर पार्कमधून विजयी झाले. कणकवलीतून उद्धव ठाकरे गटाला तिकीट मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून पहिल्या उमेदवार यादीत 65 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आता आणखी 15 उमेदवार उभे करून पक्षाने एकूण 80 जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या