मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध सुरु आहे. अशातच आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजप पक्षावर टीकेची तोफ डागली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील बेस्ट बसेसच्या तिकीटाच्या दरात वाढ होऊ शकते. राज्य सरकार बेस्टच्या तिकीटाचे (BEST bus fare) दर वाढवण्याच्या विचारात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की, भाजप हा मुंबईविरोधी पक्ष आहे. त्यामुळेच भाजपने बेस्ट बसच्या तिकीटदरात वाढ करुन मुंबईकरांचा खिसा कापायचे ठरवले आहे. अगोदरच बेस्ट बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच बस थांबण्याच्या थांब्यांचा वापर जाहिरातींचे फलक लावण्यासाठी केला जात आहे. कंत्राटदारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 




शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल


बेस्ट बसच्या तिकीटाचे दर वाढवण्याची गरजच काय? आदित्य ठाकरेंचा सवाल


आमच्या काळात आम्ही बेस्ट बसेसच्या तिकीटाचे दर परवडणारे ठेवले होते. बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करुनही जगात सर्वाधिक परवडणाऱ्या दरात आम्ही सेवा पुरवली. मात्र, भाजपच्या काळात तिकीटाचे हे दर वाढवले जात आहेत. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. राज्यात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही हा निर्णय बदलू, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


आदित्य ठाकरेंकडून राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार


राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापल्यापासून आदित्य ठाकरे हे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे राज्याच्या विविध भागांमध्ये फिरुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी नुकतीच कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये शाहू महाराज आणि सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.


आणखी वाचा


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी तुमचं ग्रुमिंग करणार होते; आदित्य ठाकरे म्हणाले...