कोल्हापूर : शाहू महाराज उमेदवार म्हणून उभा राहिल्यानंतर समोर कुणी उभं राहायला नको होतं, पण शाहू महाराज यांच्या विरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं, अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवरून तोफ डागली. कोल्हापूर लोकसभेचे शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची सभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी बोलताना आदित्य यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. एकही भूल कमल का फूल असा प्रतिसाद नागरिक देतात, एक मन की बात नहीं होगी सब के मन की बात होगी, असेही ते म्हणाले. 


आदित्य ठाकरे म्हणाले की, शाहू महाराज घराण्याचे आणि माझ्या घराण्याचे वेगळे नातं आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांनी पुढे सांगतिले की, देशाच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडी निर्माण झाली होती.  2019 साली बंटी साहेब यांनी मला सांगितलं होतं, आदित्य काळजी करू नको आमचं ठरलं आहे. 


त्यांनी सांगितले की, भाजपच्या 400 पारचं आता तडीपार होणार आहे. यावेळी समोरून तोच आवाज येताच त्यांनी एका कार्यकर्त्याला व्यासपीठावर बोलवून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ते म्हणाले की, दहा वर्षे हे सरकार एका व्यक्तीचे एका पक्षाचे होत. तुम्ही फक्त मन की बात ऐकायचं, तुमचं कधी ऐकलंय का? 10 वर्षांपूर्वी जे जुमले होते त्याचे नाव आता केवळ गॅरेंटी हे नाव दिलं.


10 वर्षे मनात होते तशी सत्ता गाजवली


त्यांनी सांगतिले की, चारशे पार सोडा, भाजपच्या जेमतेम 200 पर्यंत जागा येतील. दिल्लीत आप आणि काँग्रेसच्या सर्व जागा निवडून येणार आहेत. मागील10 वर्षे मनात होते तशी सत्ता गाजवली. मटण, चिकन, मासे खायचे बंद करणारे सरकार चालणार आहे का? 100 स्मार्ट सिटी होणार होत्या 1 तरी सिटी तयार झाली का? भाजपने 10 वर्षे सत्ता भोगली आणि आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं? असा टोला त्यांनी लगावला. 


आदित्य पुढे म्हणाले की, काल फडणवीस म्हणाले कोरोना लस मोदींनी बनवली, पण ही लस महाराष्ट्रात तयार झाली, आपल्या पुण्यात झाली. केंद्राने सांगितलं की तुम्ही लसीला हात लावू नका ही आमच्या पद्धतीने लस देणार आहे. महाराष्ट्रात नाही तर देशात कुणाला हे सरकार आपलं वाटतं नाही. चीन विरोधात वापरायला पाहिजे होतं ते सैन्य दिल्लीत शेतकऱ्यांवर वापरले. 


इतर महत्वाच्या बातम्या